सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिहे-कटापूरसाठी कधी राष्ट्रवादीने संघर्ष केलाय का? त्यांच्या स्थानिक नेत्यांना जिहे-कटापूर माहिती आहे का? जिहे-कटापूरचे पाणी शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचले नाही तर, मी निवडणूक लढवणार नाही. या शब्दावर मी आजही ठाम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्व नेते जिहे-कटापूरचं पाणी माणमध्ये येऊ नये, असा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला.
साधारण पाच कोटी रक्कमेच्या सितामाई घाट रस्त्याचे भूमीपूजन माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार गोरे म्हणाले, ”जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांनी प्रामाणिकपणे ठरवलं असतं तर, आज माण-खटाव सुजलाम सुफलाम झाला असता. पण, त्यांनी हे काम केले नाही. संघर्ष विकासासाठी असला पाहिजे.”
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, आज कुळकजाई भागाला पाणी द्या ही मागणी इथली माणसं करत आहेत. ही भावना का निर्माण झाली, असा प्रश्न करून आमदार गोरे म्हणाले, जनतेला माहिती आहे, आपला आमदार, आपला खासदार डोंगरावरही पाणी आणू शकतो. सितामाईच्या कृपेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर कुळकजाईला पाटाने पाणी येईल. एवढी ताकद त्या माणसाच्यात आहे, असेही आमदार गोरे म्हणाले.
You must be logged in to post a comment.