सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): हातगेघर ता.जावली येथील शेळीवर रविवारी दुपारी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला असून घडलेल्या घटनेने डोंगरपरिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हातगेघर, ता. जावळी येथील पायटा शिवारात रविवारी संदीप नामदेव गोळे शेळ्या चारण्यास गेला होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गोळे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने बिबट्याने तेथून पळ काढला तर शेळीचा जागीच मृत्यू तर शेतकऱ्याने जिवाच्या भितीने तेथून पळ काढला. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्याने शेतकरीही घाबरून गेलेले आहेत. वनखात्याने मृत शेळीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. यावेळी शिवारात सुनिल सर्जेराव गोळे, तेजस रामदास गोळे, मारूती पार्टे आदी शेतकरीही उपस्थितीत होते. बिबट्याच्या झालेल्या हल्याने शेतकरी, गावकरी भयभीत झाले आहेत. तरी सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
You must be logged in to post a comment.