वरुणराजाचा रुद्रावतार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वर, जावली, सातारा, वाई आणि पाटण तालुक्यात ही जोरदार पडत असून जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळपासून पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी, ओढे-नालांमधील पाणी पातळी ओलांडली. त्यामुळे अनेक ठिकाणी गावे संपर्कहीन झाले आहेत. तसेच रस्त्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी  शेतीचे व पिकांचे मोठयाप्रमाणावर नुकसान झाले आहे. धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि कोयना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्याने धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या खालील क्षेत्रातील ओढयांच्या पाण्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. बुधवार दि 21 जुलै च्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जोर, जांभळी खोऱ्यात अनेक ठिकाणी शेताचे नुकसान झाले आहे. भूस्खलन झाल्याने मौजे बलकवडी तालुका वाई व नांदगणे फणसेवाडी यांना जोडणारा पूल तुटल्याने दोन गावचा संपर्क तुटलेला आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भाताच्या ताली, बांध ,भाताची रोपे वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कास बामणोलीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढया काठावरील भात शेतीत ओढयाचे पाणी शिरून भात लावणी केलेली भात खाचरे गाडली आहे. त्यामुळे शेतीचे  प्रचंड नुकसान झाले. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने महाबळेश्वर, जावली, सातारा तालुक्यातील गावांचा संपर्क सुटलाआहे.

error: Content is protected !!