सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाने झोडपले

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मंगळवारी जोरदार पावसाने झोडपले.साताऱ्यासह कराड, पाटण भागाला दुपारच्या सुमारला झालेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. कराड, सातारा, वाई येथे रस्ते जलमय झाले असून नदी, नाले वसुंधरा वाहू लागले आहेत.

यावर्षी गतवर्षीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाचे सावट जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणवत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर मंगळवारी दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने सारा परिसर जलमय होऊन गेला. या पावसामुळे बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कराड, पाटण, वाई ,सातारा तसेच तालुका परिसरामध्ये सायंकाळी चारच्या नंतर सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला.या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणीच पाणी झाले.सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात पावसाचे पाणीच असल्याने वाहन चालक व नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

वाई ,महाबळेश्वर,पाचगणी येथेही सुमारे दीड तास जोरदार पावसानमुळे नागरिकांची पळापळ झाली. कोयना धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे कोयना धरणाची पाणी पातळीची शंभरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. हा पाऊस पावसाचा अनुशेष भरून काढेल असा अंदाज असून या पावसामुळे बळीराजाला सुद्धा थोडासा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान ,पुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहील असे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!