सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा येथील श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलच्या सोहम दीक्षित यांची 33 व्या ज्युनियर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये इ 10 वी तील विद्यार्थी सोहम दीक्षित यांची 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या 33 व्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघात 48 ते 50 किलो वजनी गटात निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल हिंदवी स्कूलचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, सचिव नानासाहेब कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक विनोद दाभाडे, संदीप कदम व गौरव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
You must be logged in to post a comment.