सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – शाळेचा पहिला दिवस म्हटलं की नवी कपडे, नवी पुस्तके, नवे दप्तर आणि उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर भेटणारे मित्र अशी नवलाई अनुभवण्याचा दिवस होय. पण करोना आणि लाॅकडाऊनमुळे प्रत्यक्ष शाळेचा प्रवेश दिन अनुभवता येत नसल्याने विद्यार्थी हिरमुसले आहेत. हिंदवी पब्लिक स्कूलच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शाळा प्रशासनाने ऑनलाइन शिक्षणामध्ये अनुभवात्मक शिक्षणावर भर देण्याचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या जीवनात नवलाई आणली.
करोना काळामुळे शासनाने शाळांना पूर्ण टाळेबंदी केली आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरु झाले आहे. यामध्ये शिक्षकांची उपस्थिती राहणार असून विद्यार्थ्यांना शाळेत वर्ग भरण्यास मनाई करण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे शाळांच्या प्रांगणात किलबिलाट झालाच नाही. चिमुकल्यांच्या अस्तित्व विना शाळा सुन्यासुन्या राहिल्या. मागील वर्षी सततच्या ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी नंतर कंटाळले होते. त्याचा पुन्हा ऑनलाईन शिक्षणाने शाळा सुरू होत आहेत. मात्र, हिंदवी पब्लिक स्कूलचा वर्धापन दिनी शाळा प्रशासनाने नाविण्य उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. शाळांची स्वच्छतेबाबतची सर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देत शिक्षकांच्या ऑनलाइन-ऑफलाइन बैठका घेतल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी पालकांचे ऑनलाइन बैठका घेऊन नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली.
आज सकाळी विद्यार्थी शाळेच्या ऑनलाईन शाळेत उपस्थित होते. सकाळी साडेनऊ वाजता घंटा वाजली. ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला. त्यांची शाळेचे सुरक्षा रक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भेट करुन दिली.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी सरस्वतीचे पुजन केले. प्रार्थना झाल्यानंतर अमित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीर्घ कालावधीनंतर आजपासुन शैक्षणिक क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू होत आहे. हे वर्ष विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानार्जनासाठी, शिक्षकांना विद्यादान करताना समाधान देणारं, पालकांना पाल्यांच्या शिक्षणाचा आनंद देऊन नवनवीन प्रगतीची नवीन वाटं स्फुरणारं असू दे, अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ऑनलाईन क्लासेस घेण्यास शिक्षकांनी सुरुवात केली असून विद्यार्थी घरीच राहून आपला दैनंदिन अभ्यास करणार आहेत. ऑनलाईन शाळा आजपासून सुरू असल्याने अनेक पालकांनी आज शाळेत हजेरी लावत आपल्या पाल्याचे नाव शाळेत नोंदवायला सुरुवात केली.
You must be logged in to post a comment.