सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत शाहूपुरी येथील हिंदवी पब्लिक स्कूलच्यावतीने जनजागृतीसाठी 12 ऑगस्टला शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसेच सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. अशातच देशभरात घराघरात तिरंगा फडविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदवी पब्लिक स्कूलमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज स्कूलच्यावतीने शाहूपुरी परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक सहभागी झाले होते.
या प्रभातफेरीमुळे शाहूपुरी परिसरात देशभक्तीमय वातावरण तयार झालं होतं. मुख्याध्यापक कॅटन प्रकाश नरहरी यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीला हिरवा झेंडा दाखविला. प्रभात फे-यांमध्ये ढोल पथक, झांज पथक, लेझीम पथक, स्काऊट पथक, गाईड पथक सैनिकी शाळेचे पथक सहभागी झाले होते. काही विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करुन आले होते. स्कूल परिसरात प्रभात फेरींचा समारोप झाला तेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एकच जल्लोष दिसून आला. मुला-मुलींच्या मनात देशप्रेम, देशभक्तीचे बालसंस्कार व्हावे, या हेतूने शाळा-महाविद्यालयांत त्यांना तिरंग्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आॅनलाईन पध्दतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येl आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्पापन समितीचे सदस्य व श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी केले.
You must be logged in to post a comment.