सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आज महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. माता भगिनींचा सन्मान प्रत्येकाने केलाच पाहिजे. महिला दिनी प्रभाग क्र. २० मधील कर्तव्यदक्ष मातांचा सन्मान करून नगरसेविका लीना गोरे यांनी अभिनव आणि आदर्श उपक्रम राबवला आहे, असे प्रतिपादन श्रीराम स्वाध्याय परिवाराच्या संचालिका उर्वशी जानी यांनी केले.
प्रभाग क्र. २० येथे महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका गोरे यांनी महिलांसाठी लकी ड्रॉ, होम मिनिस्टर स्पर्धेचे मोफत आयोजन केले होते. तसेच यावेळी १० मातांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. याप्रसंगी जानी बोलत होत्या. यावेळी नगरसेविका गोरे, आशा झोरे, उषा गोरे, नम्रता घाडगे, रेश्मा मोरे, शोभा सांडगे, आशा भोकरे, श्वेता झोरे, मंजुषा केंडे, सुरेख करवले, आस्मा महात, सुचित्रा रामाने, गौरी नारकर, गौरी नवले, मनीषा माने, आरती तिवाटने, सविता शिंदे, राजू गोरे मित्र समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लीना गोरे यांच्यामार्फत सलग ९ वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे. प्रभागात गेली १० वर्ष प्रतिनिधित्व करत असताना महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना विविध उपक्रम राबवले. प्रभागात मूलभूत सोयी सुविधा पुरवून अनेक उल्लेखनीय कामे मार्गी लावली आहेत, असे गोरे यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमात १११ वस्तूंचा लकी ड्रॉ झाला. रोहिणी जोशी यांना प्रथम क्रमांकाचा सोफा सेट, ज्योती पाटील याना आटाचक्की, शमशाद काझी याना सुवर्णफुले असे बक्षीस मिळाले. होम मिनिस्टर स्पर्धेत दीपाली पवार या पैठणीच्या मानकरी ठरल्या. मंजुषा केंडे यांना सोन्याची नथ तर शाहीन बागवान व अश्विनी वाघ या उपविजेत्या ठरल्या. यावेळी उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आली.
You must be logged in to post a comment.