सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोविडच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये मंडळाच्या सुधारित कार्य पध्दतीनुसार तयार करण्यात आलेला बारावीचा सातारा जिल्ह्याचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या कोल्हापूर विभागीय मंडळाने कोल्हापूर ने आॅनलाईन पध्दतीने हा निकाल जाहीर केला. जिल्ह्यातील २४६ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३५ हजार ६१९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील ३५ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.दरम्यान, परिक्षा न देता आॅनलाईन निकाल लागल्याने उत्तीर्ण अनुत्तीर्ण याहीपेक्षा विद्यार्थ्यांना टक्क्यांची चिंता लागली होती. त्यामुळे संकेतस्थळावर सायंकाळी ४ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनीच मोबाईल हातात घेतला. आपला निकाल पाहून मित्र मैत्रीणींचे निकाल पाहून त्यांना याविषयी माहिती देण्याची धावपळही विद्यार्थ्यांनी केली.
You must be logged in to post a comment.