सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यात पहिला 100 फूट ध्वज उभारण्याचे आला असून ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात आज रक्ताचा तुटवडा असून रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.या महा रक्तदान शिबिरामध्ये १ हजार १११ लोक रक्तदान करणार असून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लोकाभिमुख काम करून आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी केले.
दौलतनगर ता. पाटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र दौलत येथे लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारक येथे उभारण्यात आलेल्या स्तंभ व ध्वजाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई , मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, देसाई कुटुंबीय , कोल्हापूर परिक्षेत्राचे महा निरीक्षक मनोज मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, डिके प्लॅग फाऊंडेशनचे राकेश बक्षी यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रमध्ये कोविड मुकाबला करीत असताना जीवाची बाजी लावून प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी काम केले त्या कोविड योध्याचा याठिकाणी सत्कार होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पावलावर पाउल ठेवून त्यांचे नातू गृहराज्यमंत्री ना. शंभुराज देसाई राज्याची उत्कृष्ट जवाबदारी पार पाडत आहेत. महारक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून या माध्यमातून समाजाला अपेक्षित असणारे काम करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. स्व बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण औचित्य साधू विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
You must be logged in to post a comment.