हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवणाऱ्या पती – पत्नीला अटक

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) :व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील चॅटिंग करून वाई तालुक्यातील तीन तरुणांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवणाऱ्या पती – पत्नीला अटक करण्यात आले आहे. त्यांना २० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

वाई तालुक्यात हनीट्रॅपद्वारे तिघांना जाळ्यात ओढून एका महिलेने व तिच्या पतीने त्यांच्याकडून तब्बल साडेचार लाख रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत बोपेगाव येथील युवकाने तक्रार दाखल केली असून कवठे व सटालेवाडी येथील युवकांचीही अशीचपूनम हेमंत मोरे (वय ३०) व हेमंत विजय मोरे (वय ३१, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. कुडाळ, ता. जावली) अशी संशयित पती-पत्नीचे नाव आहे.जितेंद्र सोपान जाधव (वय ३०, रा. बोपेगाव) याने याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली आहे.

error: Content is protected !!