नवऱ्याने पेटवले घर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : घऱगुती कारणावरुन पत्नीशी भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की पतीने स्वतःच आपल्या घऱाला आग लावल्याची घटना पाटण तालुक्यातील माजगाव येथे घडली. यात आगीमुळे घऱातील सिलेंडरचा स्फोट झाला. आणि शेजारची तब्बल १० घऱही जळून खाक झाला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, १० घऱ जळून खाक झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पतीला चोप दिला.

याबाबत माहिती अशी की, माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडणे सुरु होती. यावेळी रागाच्या भऱात संजय पाटील याने स्वतःच्या घराला आग लागली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनेही पेट घेतला. नंतर ही आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या आगीने रौद्ररुप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांनी पेट घेतला. यात आग लागलेल्या घऱातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी संजय पाटील याला चांगलाच चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन गुन्हा दखल करत आरोपी संजय पाटील याला अटक केली आहे.

error: Content is protected !!