मी काही कच्चा खेळाडू नसून दोन पिढ्या संघर्ष करून आलोय : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार मला आणि आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून दोन पिढ्या संघर्ष करून आलेलो आहे. जो माणूस शरद पवार आणि श्रीमंत रामराजे यांच्या पुढे हरलो नाही मग या ठिकाणच्या आंडू पांडूनी माझा नाद करू नये, असा टोला दिगंबर आगवणे यांना खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना भाषणात लगावला आहे.

फलटण येथे झालेल्या शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप समारंभामध्ये माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणचे उद्योजक दिगंबर आगवणे यांच्यावर टीका केली आहे.आगवणे यांनी खासदारांनी फसवणूक केल्याच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे.

error: Content is protected !!