सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मी डेटाबेस बोलते, थिल्लर बोलत नाहीय. राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे मी एक तासात खोडून काढू शकते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर आज येथे लगावला.
कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी खासदार सुळे यांनी आज अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगीता साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, जयंत बेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार सुळे पुढं म्हणाल्या, काही लोकं खूप भाषण करतात आणि पवार साहेबांवर टिका-टिप्पणी करतात. भाषणामध्ये राज ठाकरे यांनी पवार साहेब नास्तिक आहेत, कधीही कोणीही त्यांना मंदिरात जाताना बघितलेलं नाही, असं सांगितलं. अलिकडं नवीन नेते भाषण करताना भान ठेवत नाहीत. मी सोलापूरला गेल्यावर तेथील सिध्देश्वर मंदिरात गेले. तेथील अध्यक्षांनी माझा सत्कार करुन ताई तुम्ही दुसऱ्यांदाच मंदिरात आला आहात. अजित दादाही एक-दोन वेळाच आले आहेत.
You must be logged in to post a comment.