सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. जर भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंटवरून मी उडी मारेन आणि पुरावे देवू शकला नाही, तर त्यांनी उडी मारावी असं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दिले आहे.
सातारा पालिकेच्यावतीने पालिकेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सध्या जिल्हा परिषदेच्या समाेर सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आज खासदार उदयनराजे भाेसले हे सकाळीच तेथे पाेहचले हाेते. तेथेच त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह त्यांच्या नगरविकास आघाडीवर हल्लाबाेल केला.
खासदार उदयनराजेंनी सातारा पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत हिम्मत असेल तर मी बोललेल्या गोष्टींना उत्तर द्या. फक्त मिशीवर हात फिरवून काही होत नसतं अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंवर केली. यावेळी ५० च्या ५० नगरसेवक सातारा विकास आघाडीचे निवडून येतील असा विश्वास देखील उदयनराजेंनी व्यक्त केला आहे. माझी सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आहे. तुमच्या सारखा मी आल्हाद आमदार झालेलो नसल्याची खोचक टीका देखील खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यावर केली.
You must be logged in to post a comment.