सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे हे शिवसेना पक्ष सोडणार असल्याची राज्यभर चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. याबाबत स्वतः आमदार महेश शिंदे यांनी भाष्य करत मी शिवसेनेचा आमदार आहे आणि मी पक्ष बदलणार नाही, असे स्पष्टीकारण दिले आहे.
याच वेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर कोणतीही टीका केलेली नाही. मी फक्त त्यांच्याकडे एक छोटीशी मागणी केली आहे. तुम्ही जर मनात आणलं तर संपूर्ण राज्यातली जनता सुखी होऊ शकते. रयत शिक्षण संस्था कर्मचाऱ्यांच्या हातात द्या आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्या संस्थेचे अध्यक्षपद द्या, अशी छोटीशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे. जर राज्य सरकार त्या संस्थेला पैसे देत असेल तर राज्य सरकारचा मुख्यमंत्री त्या संस्थेचा अध्यक्ष असायला पाहिजे. हाच नियम स्वामी संस्थेलाच लागू आहे. रयत शिक्षण संस्था आणि स्वामी संस्था या राज्याच्या खुप मोठ्या संपत्ती आहेत. त्या संपत्तींच खासगीकरण होणे हे क्लेशदायक आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
You must be logged in to post a comment.