सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी करून सगळीकडे सांगत सुटले मी सरकार पाडले.स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात गद्दाराला संधी नसते. महाराष्ट्रात आगामी विधानसभा, लोकसभेला महायुतीतला कोणीही निवडून येणार नाही हे जनतेनेच ठरवले आहे. मी मागील निवडणुकीत बऱ्याच जणांना अंगावर घेतल्याने, मला मागच्यावेळी फटका बसला. शशिकांत शिंदे कुठुन लढणार याबाबत अनेकजण विचारतात, परंतु या हुकुमशहाला मीच पाडणार. ज्या दिवशी डोक्याच्या वरती जाईल. त्या दिवशी शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरेल. त्यावेळी महागात पडेल, अशा आक्रमक शब्दात आ. महेश शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना जाहीर आव्हान शशिकांत शिंदे यांनी दिले.
अंबवडे (ता. कोरेगाव) येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, प्रभाकर देशमुख, सविनय कांबळे, दिपक पवार, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जंग अभी शुरू हुई है….
आ.शशिकांत शिदे म्हणाले,महाराष्ट्राच्या परिवर्तनाची सभा सातारा जिल्ह्यात दिवाळी आणि नवरात्रीच्या मधील काळात घेणार आहोत. गेल्या २०-२५ वर्षाच्या काळात मी माणसं कमावली. मागच्या निवडणुकीच्या काळात एक अपघात झाला. त्यानंतर सत्ता नसताना माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. माझ्यावर शरद पवार साहेबांनी प्रेम केलं. खा. श्रीनिवास पाटील साहेबांचा निकाल कळला, पवार साहेब सातारला यायला निघाले होते. परंतु, तेव्हाच माझा पराभव झाल्याचे कळले अन् दाैरा रद्द केला. आठ दिवसांनी मला पवार साहेबांनी बोलावून घेतलं अन् सांगितलं शशिकांत मी तुला परत आमदार करतोय. सातारा जिल्ह्यात पावसातील सभेने इतिहास घडवला आहे. शत्रू पक्षात सर्वात जास्त भिती ही, शरद पवार नावाची आहे. त्यामुळे ”जंग अभी शुरू हुई है, शरद पवार अभी बाकी है” असे म्हणत आ. शशिकांत शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला.
केंद्रात आणि राज्यात भिती असल्याने पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. शत्रू पक्षात सर्वात जास्त कुणाची भिती आहे, तर शरद पवार नावाची आहे. केंद्रातले आणि गल्लीतलेही घाबरतात.केंद्रात मोदीची हुकुमशाही ,राज्यात पाहिली तीच कोरेगाव मतदार संघात पाहतोय. सर्वजण वेळ आणि काळाची वाट बघत आहोत, सूडाचं राजकारण किती असावे. सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीची मजबूती आम्ही या स्टेजवरून करणार आहोत. आमची लढाई पदाची नाही, हुकुमशाहीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे. विरोधक दिलदार असावा लागतो. साहेबांच्याकडे बघून मी संस्कृतीत राहतो. असे सांगून येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत असाच पाठिंबा आणि आशिर्वाद देण्याचे आवाहन यावेळी आ. शिंदे यांनी केले.
You must be logged in to post a comment.