सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : समाजातील काही सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या भेटीचे शिल्प उभारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींच्या भेटीचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे छत्रपतींची बदनामी करणाऱ्या रामदास स्वामींचे शिल्प तत्काळ हटवून शिल्प बसविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
कोकाटे म्हणाले, या प्रकरणी पुरोगामी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी, नगरपालिका, बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे श्रेय विशिष्ट सनातनी घेत आहेत. शहरातील शिल्प बसविण्याबाबत पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसताना अनधिकृतपणे शिल्पाची उभारणी केली आहे. या शिल्पामधून भाजपने जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे. हे शिल्प तातडीने हटवावे अन्यथा ते तोडण्यात येईल असा इशारा कोकाटे यांनी दिला.
You must be logged in to post a comment.