मुंगी घाटात हर..हर.. महादेवचा जयघोष

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर (ता. माण) येथील शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला आहे. बुधवारी ढोलताशांचा गजर अन् गुलालाची उधळण करीत मानाच्या कावडींनी मुंगी घाट सर केला. या घाटातून कावडी चढविण्याची परंपरा सुमारे सातशे वर्षांपासून सुरू आहे. हर.. हर.. महादेवच्या जयघोषाने येथील वातावरण भक्तिमय झाले होते.

error: Content is protected !!