सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : अलीकडे रस्त्यावर केक कापणे ही जणू काय फॅशनच झाली आहे. सार्वजिनक ठिकाणी अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असून, शनिवारी सायंकाळी सदर बझार येथे रस्त्यावर केक कापणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर केक अन् त्यांच्या नऊ गाड्यांसह त्यांची वरात पोलीस ठाण्यात आणण्यात आली.
ऋतिक जितेंद्र शिंदे (रा, बागडवाडा गोडोली सातारा), अक्षय सुनिल जाधव (रा.करंजे सातारा), सागर चंद्रकांत साळुखे (रा.कृष्णानगर,सातारा),प्रितम अनिल चव्हाण (रा.गणेश कॉलनी, जुना आरटीओ चौक सातारा),दिनेश राजेंद्र निकम (रा-विकासनगर,सातारा), सुरज शंकर साळुखे (रा.तडवळे, ता.कोरेगांव),संकेत प्रल्हाद शिंदे (रा.रणशिंगवाडी, ता.खटाव जि.सातारा),पुरुषोत्तम नारायण भोसले (रा.विकास नगर,सातारा) अक्षय संजय जातक (रा.वर्णे ता.सातारा),प्रविण अशोक खडपद (रा.सदरबझार),गौरव पांडुरंग मोरे (रा.कारी ता.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
बडे बाॅय ऋतिक शिंदे याचा शनिवारी वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र सदर बझारमधील कुबेकर गणपती मंदिराजवळील रस्त्यावर जमले होते. गाडीवर केक ठेवून वाढदिवसाचा जल्लोष करत होते. याचवेळी पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर आपत्ती व्यवस`थापन, साथरोग अधिनियमन, महाराष्ट्र कोविड अधिनियमन अशा विविध कलान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राहुल खाडे, सुनिल कर्णे, किशोर भोसले, मंगेश सोनावणे, सागर निकम, अश्विनी झुंझार यांनी केले.
You must be logged in to post a comment.