सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): माजी जिल्हा परिषद सदस्य राजु भैय्या भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आंबवडे खुर्द येथे जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या मैदानी स्पर्धेत पैलवान संतोष जगताप हे चांदीच्या गदेचे मानकरी ठरले.
महारुद्र तालिम संघ ग्रामस्थ मंडळ आंबवडे खुर्द, शेळकेवाडी तालीम संघ, छत्रपती तालिम संघ कारी, क्रीडा प्रबोधनी तालीम संघ सातारा, तालिम संघ मेढा व संतोष दादा भोसले मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने अंबवडे येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 38 कीलो गटात पै.शिवराज माने तर 65 किलो गटात पै.तेजस माने , तुषार गुजर, तसेच ८०ते ९०किलो वजन गटात तालीम संघ साताऱ्याचा पैलवान अनिकेत चव्हाण यांने तालीम संघ मालचौंडीचा पैलवान सुमित कदम याला चितपट करत मानाची चांदीची गदा व रोख रक्कम पटकावले.
यावेळी तहसीलदार राजेश जाधव, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, रवी भैय्या ढोणे, धनंजय जांभळे, पै.रोहन केंडाळे, दिपक शिंदे, , श्रीरंग देवरुखे, विजय गुजर आदी मान्यवर उपस्थित होते. परळी पंचक्रोशीमध्ये प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात निकाली जंगी कुस्त्यांचे मैदान बनवण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातून पैलवान उपस्थित राहिले होते.
आपल्या मर्द मराठी मातीतील खेळ रुजला पाहिजे तरुणांना कुस्ती बद्दल ओढ निर्माण झाली पाहिजे यासाठी स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती संतोष (दादा) भोसले यांनी दिली. या कुस्त्यांचा थरार सायंकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु होता.एकावेळेस चार ते पाच कुस्त्या लावण्यात येत होत्या.
कुस्तीनिवेदक पै. रोहन केंजळे व पै. जे. के. कणसे यांनी उकृष्ट निवेदन करत प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळेस हालगी वादक जगदंब हलगी ग्रुप वाढे यांनी आपल्या हलगीची कला दाखवून उपस्थितांची चैतन्य निर्माण केले.
कुस्ती शौकिनांची गर्दी अन् पैलवानांचे डावपेच
परळी खोरे तसा रांगडा भाग मात्र कुस्त्यांचे फड हे पुर्वी व्हायचे त्याचे प्रमाण कुठे तरी कमी होत असतानाच राजु भैय्या यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भव्य निकाली कुत्यांचा फड उभारण्यात आल्याने कुस्ती शौकिनांसाठी एक पर्वणीच पहायला मिळत होती. प्रेक्षकांचा उत्साह पाहून पैलवानांनी गुण मिळवत तर काहींनी एकीरी पट, हिस्सा डाव, छाडी टांग, पट काढणे अशा पध्दतींच्या डावांनी समोरच्या पैलवानांना चितपट केले.
You must be logged in to post a comment.