सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसनवीर 750 कोटी, खंडाळा 125 कोटी, प्रतापगड 44 कोटी असे तब्बल 1 हजार कोटींचे कर्ज व देणी आहेत. या देण्यांमुळेच कारखान्याची अवस्था बिकट झाली आहे. साखर, बगॅस, अल्कोहोल, मळी शिल्लक नाही. मग कारखान्यातील पैसा गेला कुठे? , असा सवाल आमदार मकरंद पाटील यांनी केला.
भुईंज येथील किसन वीर कारखान्याच्या निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.आ. पाटील म्हणाले, गतवर्षीचे 56 कोटी रूपये शेतकर्यांना न दिल्याने शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. एका बाजूला कर्जाचा डोंगर दुसर्या बाजूला कारखान्याकडे साखर, अल्कोहोल, मळी, बगॅस शिल्लक नाही. नुसत्या कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. मदन भोसले यांचा चुकीचा कारभार, एकाधिकारशाही व भ्रष्टाचारामुळेच कारखाना अडचणीत आला आहे.कामगारांना 22 ते 23 महिने पगारच दिले नसल्याने त्यांना मजुरीला जावे लागत आहे.
You must be logged in to post a comment.