सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माणदेशी फौंडेशनच्या कार्डियाक ॲम्बुलन्सचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा उपस्थित होत्या.
आजची ही कोविड परिस्थिती पाहून माणदेशी फौंडेशनने कोविड रुग्णांची गैरसोय होऊ नये या साठी माण तालुक्यातील पहिल्या दोन कार्डियाक ॲम्बुलन्स खरेदी केल्या व्हेंटिलेटर सहित. आज सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग व माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्या हस्ते त्यांचे अनावरण करण्यात आले. तसेच माणदेशी ऑक्सीजन बँकेचे ही उद्घाटन करण्यात आले.
या ऑक्सीजन बँकमध्ये 56 कॉन्सन्ट्रेटर आहेत या ऑक्सीजन बँक मुळे ज्या कोविड रुग्णांना हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर सुद्धा ऑक्सीजन घेण्यास त्रास होतो त्यांना हे ओ2 कॉन्सन्ट्रेटर मोफत देण्यात येणार आहेत. या ॲम्बुलन्स कोविड रुग्णासाठी मोफत सेवा देतील. तसेच 6 बायोपॉप मशीन व 25 ओ2 कॉन्सन्ट्रेटर मशीन याचे जिल्हाधिकारी कार्यालय यांना वितरण करण्यात आले.
You must be logged in to post a comment.