सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे यांनी रविवार पेठेतील गिते बिल्डींगमध्ये सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे शनिवार दि.९ एप्रिल रोजी शिवसेना नेते, ना.एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, उपनेते, सातारा सांगली संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद,जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे,आमदार महेश शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक राजाभाऊ भिलारे,प्रवीण पाटिल, सुमित नाईक,शहापूर तालुका संपर्क प्रमुख आकाश सावंत,दिपक चव्हाण,मंगेश जाधव,अमोल पवार,रुपेश सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या शहरात गेली दोन वर्षापासून शिवसेनेची ताकद वाढविण्यात शिवसेना शहर प्रमुख आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश मोरे यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. प्रचंड जनसंपर्क आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कार्यामुळे शहरात व जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढताना दिसते.
कार्यक्रमाचे स्वागत निलेश मोरे यांनी तर मंगेश चिवटे यांनी आभार मानले. यावेळी सातारकर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.