सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा, ता. कराड येथे रस्त्याच्या लगत वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबटा बराच वेळ विश्रांती करीत होता. नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने बिबट्या शेजारील शेतात पळून गेला.
याबाबत माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाचवड फाटा येथे बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला चालताही येत नव्हते. दरम्यान, तो रस्त्यालगत काही वेळ बसून राहिला. त्यानंतर गाडा आणि माणसांची वर्दळ वाढू लागली नसल्याने बिबट्या जखमी अवस्थेत शेजारील ऊसाच्या शेतात निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने धाव घेतली. काही ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठस्से दिसून आले. वनविभागाने माघ काढला असता बिबट्या आगशिव परिसरात निघून गेल्याचे दिसून आले आहे. तरी परिसरातील ग्रामस्थांना सतर्कता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
You must be logged in to post a comment.