सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदी केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरु आहे. या छापेमारीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात येतेय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु आहे. पण सगळं झाल्यावर कुणालातरी शिक्षा झाली आहे का? एक दिवसाची जरी शिक्षा झाली असती तर आम्ही मानलं असतं. पण सगळं तोडपाणी करण्याकरता हे सगळं चाललं आहे. केवळ आपल्या पक्षात घेण्यासाठी मोदी सरकारकडून नेत्यांना भीती घालण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
You must be logged in to post a comment.