सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यां तीन जणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून हे मोठं रॅकेट पोलिसांनी उध्वस्त करताना 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत या कारवाईत 2 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फलटण शहर पोलिसानी गुरुवारी दि 29 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खंडोबा मंदिराशेजारी मलटण फलटण येथे जयकुमार पवार याचे दुमजली घराचे पहिल्या मजल्यावर मोबाईलवर तसेच रोख स्वरूपात पैसे स्विकारून आयपीएल क्रिकेट मॅचेसवर तसेच कल्याण नावचे मटका घेताना जयकुमार शंकरराव पवार (रा. मलटण फलटण), वैभव सुनील जानकर (रा शुक्रवार पेठ फलटण) यांना पकडले. त्यावेळी ते ipl मॅच वर मोबाईलच्या व्हॉटअपद्वारे सट्टा घेत असल्याचे आढळले. चौकशी अंती व्हॉटअपद्वारे त्यांनी अमर पिसाळ( रा मारवाड पेठ फलटण), दत्ता कुंभार( रा वीटभट्टी जवळ मलटण फलटण) ,सुमित चोरमले( रा धनगर वाडा बुधवार पेठ फलटण),अमित कुरकुटे (रा उमाजी नाईक चौक फलटण) ,अमोल काळे (रा दत्तनगर फलटण), संतोष काळे (रा लक्ष्मीनगर फलटण ) जेबले (पूर्ण नाव माहीत नाही) शंकर मार्केट फलटण , शौकत यासीन शेख (रा. बिरदेव नगर फलटण), नटराज शिरसागर (लक्ष्मी नगर, फलटण) यांचेकडून ऑनलाईन पैसे स्वीकारून आयपीएल क्रिकेट मॅचेस वर सट्टा तसेच मटका घेतल्याने या आरोपीविरोधात पण गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जयकुमार पवार ज्याच्या जीवावर सट्टा चालवत होता त्या पुणे येथील शशांक प्रशांत लांडे यावरही गुन्हा नोंदविला आहे आत्तापर्यंत जयकुमार शंकरराव पवार,वैभव सुनील जानकर,शौकत यासीन शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत एक एलजी कंपनीचा एलईडी टीव्ही, ऍक्टिवा मोटर सायकल ,सॅमसंग कम्पनी चा मोबाईल, वन प्लस कंपनीचे 2 मोबाईल लेनोवो कम्पनी चा मोबाईल रोख रक्कम कॅल्क्युलेटर कागद इत्यादी जुगारासाठी लागणारे साहित्य असे मिळून दोन लाखाच्या सुमारास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हयची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राऊळ करीत आहेत
You must be logged in to post a comment.