सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : विकास केला तर तो दिसला पाहिले. लोकांनी ते बोललं पाहिजे. मात्र, मी किती मोठा महापुरुष आहे, मी किती मोठा विकास केला हे बोलण्यात काहीच अर्थ नाही. दुसºयाला दुतोंडी बोलू नका. तुमची भूमीकाच दुटप्पी आहे. काही न करता स्वत:चा डांगोरा वाजवताय, स्वत:ला शाबासकी देताय ही सातारकरांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे,’ असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राजेंमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. त्यातूनच खा. उदयनराजे यांनी केलेल्या टीकेला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रविवारी जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, ‘गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसामान्य घरातील स्त्री मी सत्तेवर बसवतोय असं त्यांनी जनतेला सांगितलं. मात्र त्यांना काम करू दिलं का? त्यांना अधिकार दिले का? याच उत्तर तुम्ही द्या. नगरपालिकेतील भ्रष्टाचार तुमच्या आघाडीने संपविला की वाढविला याचं उत्तर द्या.
यांच्याकडे बोलायला मुद्दा नाही. विकासाचे विषय नाही. कोणती मोठी कामे दाखवायला नाहीत. काररखान्यावर बोलणे, दुसºयाच्या कामाचे श्रेय लाटणे, असे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहे. पालिकेकडून विकास काय झाला हे आधी सांगा. एकतरी चांगला प्रकल्प यांना पाच वर्षात करता आला का. एका बैठकीत शंभर-दोनशे विषय घ्यायचे. मात्र निधीची तरतूद नाही. पुढच्या पाच वर्षाचं बजेट मंजूर झालं तरी या कामांना मंजुरी नाही.
You must be logged in to post a comment.