सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘ऊस उत्पादक सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी डॉ. शालिनीताई पाटील यांनी उभे आयुष्य संघर्ष करत जरंडेश्वर साखर कारखान्याची उभारणी केली आहे. त्यांचा त्याग वाया जाऊ देणार नाही. त्यांना कारखाना परत मिळालाच पाहिजे, यासाठी वेळप्रसंगी मी आंदोलन छेडणार आहे,’ अशी ग्वाही ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिली.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने शनिवारी राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन डॉ. शालिनीताई पाटील यांचे पत्र, कारखाना विषयक निवेदन दिले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हाईस चेअरमन श्रीरंग सापते, संचालक पोपटराव शेलार, पोपटराव जगदाळे, हणमंतराव भोसले, धनंजय कदम, अक्षय बर्गे व कार्यकारी संचालक किसनराव घाडगे यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.अण्णा हजारे म्हणाले, ‘साखर कारखान्यांविषयी आमची भूमिका सडेतोड आणि स्पष्ट आहे. मी स्वत: डॉ. पाटील व माजी आमदार माणिकराव जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल दृष्टीक्षेपात आहे. तोपर्यंत ‘ईडी’ने जरंडेश्वर कारखान्याची जप्ती केली आहे. भविष्यात या विषयी मी आंदोलन छेडणार आहे.’
You must be logged in to post a comment.