तहसीलदार अन डीवायएसपीच्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळा म्हटले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळे भविष्यात मुलांच्या करिअरला अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आजकाल जो तो आपल्या मुलांना काॅन्वेंट किंवा खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत डोनेशन देऊन प्रवेश घेतो. पण त्याला अपवाद साताऱ्यातील दोन प्रशासकीय अधिकारी आहे. त्या दोघांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.

हे दोन अधिकारी दुसरे तिसरे कोणी नसून जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ आणि कराडचे डीवायएसपी डाॅ. रंणजीत पाटील आहेत. राजेंद्र पोळ यांनी आपला मुलगा इंद्रनील याचा मेढा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश केला. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार शिंदे यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. तर डाॅ.पाटील यांनी कराड पालिकेच्या क्रमांक ३ मधील शाळेत प्रवेश घेतला. ही शाळा आयएसओ प्रमाणित असून विविध शिष्यवृत्ती इतर अॅक्टीव्हटीमध्ये शाळांने गुणवत्ता सिध्द केली आहे.

या दोन अधिकाऱ्यांपूर्वी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामाकांत डाके व न्यायाधीश नाईक यांनीही आपली मुल सरकारी शाळेत प्रवेश दिला. सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद किंवा पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतल्याने सामान्य लोकांच्या मानसिकतेत बदल होण्यास मदत होत असून. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या गळतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!