पोरगं कुणाचं आणि नाचतंय कोण?’ शशिकांत शिंदे यांचा महेश शिंदेंना टोला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिहे कठापुर योजनेसाठी स्व.भाऊसाहेब गुदगे यांच्यापासून माझ्यापर्यंत सर्वानी प्रयत्न केले. पण जे लोक २०१९ पर्यंत जनतेत नव्हते त्यांनी श्रेय घेणं म्हणजे ‘पोरगं कुणाचं आणि नाचतंय कोण?’ हा प्रकार आहे, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी लगावला.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कठापुर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यास आमदार शिंदे यांनी संबोधित केले.

आमदार शिंदे म्हणाले, आम्ही आघाडीधर्माचे नेहमी पालन करत आलोय पण राष्ट्रवादीवर कोण टीका करत असेल तर खपवून घेणार नाही. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून किंवा नाबार्ड कडून १ रुपयांचा सुद्धा निधी मिळाला नसून जेवढा निधी प्राप्त झालाय त्यापैकी सर्वात ज्यास्त म्हणजे १८० कोटी रुपये मी मंत्री असताना दिलेला आहे. त्यामुळे या योजनेचे उद्घाटन शरद पवारसाहेब, राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार, जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते होईल. जर विरोधकांचं यात योगदान असतं तर त्यांना पहाटे चोरून जल पूजन करण्याची गरज भासली नसती.

error: Content is protected !!