सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कराड येथील कृष्णा उद्योग समूहाच्या मार्गदर्शिका जयमाला जयवंतराव भोसले (वय ८९) यांचे काल (सोमवारी) मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कृष्णा काठवर शोककळा पसरली आहे.
श्रीमती जयमला यांच्यावर दुपारी १२.३० च्या सुमारास येथील कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार झाले. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) जयवंतराव भोसले यांच्या त्या पत्नी तर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री होत. भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या त्या आजी आहेत.
You must be logged in to post a comment.