तारळेत जिलेटीनच्या कांड्या जप्त

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा विशेष शाखेने आज तारळे ता.पाटण या परिसरातछापा टाकून ९४५३ रुपये किंमतीच्या एकुण जिलेटी ८३६ च्या कांडया बेकायदेशीररित्या स्फोटक पदार्थांचा साठा जप्त केला.

पोलीस अधीक्षक सातारा यांनी अजय कुमार बंसल जिल्हयामध्ये स्फोटक पदार्थांचे बेकायदेशीरपणे होणारे साठे व त्यांची वाहतुक याबाबत माहिती काढुन कारबाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने जिल्हा विशेष शाखा सातारा पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना तारळे ता.पाटण या परिसरात बेकायदेशीररित्या स्फोटक पदार्थांचा साठा होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे जिल्हा विशेष शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रताप भोसले यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथकाने तारळे ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याने याच्या राहत्या घरी बेकायदेशीर स्फोटक पदार्थाचा साठा झडती घेतली. घराच्या पाठीमागील पत्र्याच्या कुलुपबंद शोचालयामध्ये खाकी रंगाचे चार बॉक्स आढळुन आले.सदर बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ) आढळुन आल्या. तसेच त्याचे घरासमोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये पाठीमागील बाजुस सिटच्या खाली एका निळया रंगाच्या पिशवी मध्ये २९ जिलेटीनच्या कांडया व दुसऱ्या निळया रंगाच्या पिशवीमध्ये २७ डीटोनेटर्स वायरसह आढळुन आले.

या प्रकरणी स्फोटक पदाथांचा बेकायदेशीर साठा स्वतःजवळ बाळगुन लोकवस्ती मध्ये ठेवला म्हणुन दिले तक्रारी वरुन उंब्रज पोलीस ठाण्यात गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयामध्ये एकुण (१) ९४५३/- रुपये किंमतीच्या एकुण जिलेटी ८३६ च्या कांडया (स्फोटक पदार्थ-बजन अंदाजे १०३ किलो) (२) ३,००,०००/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी असा एकुण ३,०९,४५३/- रुपये किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!