जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केंद्र सुरू


कोरोनाचा अहवाल आता 24 तासात मिळणार 

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब उभारण्यास शासनाने परवानगी  दिली होती. त्यानुसार अत्याधुनिक अशी लॅबची उभारणी करण्यात आली असून या लॅबचे उद्घाटन सोमवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराजदेसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
सातार्‍यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टींग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर आज  सोमवारी कोरोना टेस्टींग लॅबचे उद्घाटन झाले. कालच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराड मध्ये आज पासून लॅब कार्यान्वित होईल असे सांगितले होते.  या लॅबममधून  रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून  यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील.  
या लॅबमुळे कोरोना अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून कोरोनाबाधित रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी  सांगितले.
error: Content is protected !!