जिल्ह्याचा मृत्यू दर शून्यावर कधी येणार साहेब ?


आणखी नऊ जणांनी गमावला जीव; 141 पॉझिटिव्ह

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी साहेब, एकीकडे आपण जिल्ह्यात यापुढे कोरोनामुळे एकही मृत्यू होऊ नये यासाठी प्रशासन आवश्यक ती काळजी घेत आहे, असे सांगता पण दुसरीकडे मात्र जिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत वाढ होत चाललीये त्याचे काय ? अशाने आपण जिल्ह्याचा मृत्यू दर शून्यावर कसा नेणार याचे उत्तर द्यावे, अशी मागणी सातारकरांकडून होत आहे. जिल्ह्यात आणखी 9 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या 128 पोचली आहे शिवाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून आजही 141 जण पॉझिटिव्ह आढळले. दरम्यान, दिवसभरात 68 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.  


नऊ बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दूदुस्करवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, रेठरे बु.  ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, सायगांव ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, वाठार ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये गुरुवार पेठ कराड येथील 36 वर्षीय पुरुष, भुतेघर ता. जावली येथील 53 वर्षीय पुरुष, कुरवली ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष, नवसारी ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष अशा नऊ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
जावली :
दूदूस्करवाडी येथील 55 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बाळ, 44 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, 19 वर्षाचा युवक, 32, 53 वर्षीय महिला, 20, 19  वर्षाचा युवक, 67, 22 वर्षीय महिला, 36 वर्षाचा पुरुष, 80, 52, 52 वर्षाची महिला, दापवडी येथील 18 वर्षाची महिला, निपाणी मुरा येथील 21, 22 वर्षीय महिला, सातारा : शाहुपूरी, सातारा येथील 60 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 18 वर्षाची महिला, 29 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षाचा मुलगा, कासारी येथील 44 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, सोनापूर नागठाणे येथील 62, 68, 34 वर्षीय पुरुष, सदर बझार सातारा येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, गडकरआळी येथील 50 वर्षीय पुरुष, शिवराज (पे. पंप) येथील 47 वर्षीय पुरुष, भैरवनाथ कॉलनी येथील 33 वर्षीय पुरुष, कराड : सैदापूर येथील 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 35, 85 वर्षीय महिला, 4 वर्षाचा बालक,  24  वर्षीय पुरुष, 30, 45, 16 वर्षाची महिला, आंबवडे येथील 33 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 50, 86 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 6 वर्षाची बालिका, 18 वर्षाचा युवक, मसूर येथील 64 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, गोळेश्वर नगर येथील 34 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 2 वर्षाचे बाळ, चिखली येथील 30 वर्षीय महिला, रेटरे बु येथील 40 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, नांदगाव येथील 63 वर्षीय महिला,  ओंढोशी येथील 39 वर्षीय महिला, 14 वर्षीय महिला, 2 वर्षाचे बालक, 10 वर्षाची मुलगी, मंगळवार पेठ, कराड येथील 25 वर्षीय पुरुष, कारवे येथील 36 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 7 वर्षाची मुलगी, गोवारे येथील 44 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 30 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 64 वर्षीय पुरुष, कराड येथील 25 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 76 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला, पाटण   :  नेसरवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, नेरले येथील 63 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षाचा बालक, आंबराग येथील 29 वर्षीय पुरुष, 28, 27 वर्षीय पुरुष, 50, 25, 20 वर्षीय महिला, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला, 4 वर्षाचा मुलगी, पाटण येथील 53 वर्षीय महिला, कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, वाई : शांतीनगर येथील 48 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 53 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 65 वर्षीय पुरुष, शेंदूर्जेणे येथील 68 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 10 वर्षाचा बालक, 40, 60 वर्षीय महिला, वाई येथील 71 वर्षीय पुरुष, 31 महिला 3 वर्षीय बालिका, 1 वर्षाची बालिका, 36 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, 36 वर्षाची महिला, 16 वर्षाची महिला, 11 वर्षाचा मुलगा, वेळे येथील 40 वर्षाची महिला, बावधन येथील 45 वर्षाची महिला, भुईंज येथील 59 वर्षीय पुरुष, कोरेगाव : तालुक्यातील वाठार येथील 5 वर्षाची मुलगी, 50 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, 46 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 7, 10 वर्षाचा बालक, 23, 83 वर्षीय पुरुष, 72 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 25 वर्षीय महिला, नायगाव येथील 55 वर्षीय महिला, 30, 42 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष, फलटण : रिंग रोड, फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, 77 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, 10 वर्षाचा मुलगा, मलटण येथील येथील 33 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 66, 30 वर्षीय महिला,  33, 35 पुरुष, 10, 9 वर्षाची मुले, जिंती नाका येथील 38 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 30 वर्षीय पुरुष, कुरवली खु येथील 59 वर्षीय पुरुष (मृत्यु), गोखळी येथील 67 वर्षीय पुरुष, माण : पुळकोटी येथील 35 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 13 वर्षाचा बालक, शिरताव येथील 42 वर्षीय महिला, खंडाळा : धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 16 वर्षीय महिला, 41, 42 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, शिरवळ येथील 26, 44 वर्षीय पुरुष, कोंढे येथील 30 वर्षीय महिला, देवघर येथील 35 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष, विंग येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 9 वर्षाचा बालक, 10 वर्षाचा बालक, 14 वर्षाचा युवक, 84, 42 वर्षीय पुरुष, पळशी येथील 70 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : रांजणवाडी, महाबळेश्वर येथील 44, 40 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा बालक असे कोरोनाबाधित आढळले आहेत. 

आणखी 141 जण बाधित
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 141 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील रात्री प्राप्त होऊ शकला नाही.

68 नागरिकांना दिला डिस्चार्ज 
खंडाळा : पळशी येथील 55 वर्षीय महिला, जावली : दापवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 33, 75,75,54,28,50 वर्षीय महिला 19 वर्षीय तरुणी व 11,13,3 वर्षीय बालीका व 76, 56 वर्षीय पुरुष, सातारा : सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, तामजाई नगर येथील 30 वर्षीय पुरुष, विमल सिटी येथील 65,25,47 वर्षीय महिला,   खावली येथील 30 वर्षीय पुरुष, कर्मवीर नगर खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष, वाई : शेंदुर्जणे येथील 30, 28 वर्षीय महिला 65, 48 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय बालीका, 13,12 वर्षीय बालक, सायगांव येथील 64 वर्षीय महलिा, बोपेगांव येथील 35 वर्षीय पुरुष, खटाव : खटाव येथील  50 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58, 59 वर्षीय महिला, कराड : सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष 20 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40,43 वर्षीय पुरुष, मिरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय युवक. पाटण : पाटण येथील 53 वर्षीय पुरुष, कासणी येथील 53 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : गोडवली येथील 2 वर्षाची बालीका, 22,25,46,20 व 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, फलटण : येथील लक्ष्मीनगर येथील 42,49,45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुणी, वारेवस्ती खामगांव येथील 62,24,52,25,22,70,26 वर्षीय पुरुष व 55,45,20 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 50 वर्षीय महिला, माण : दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष अशा 68 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

834 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 22, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 35, कोरेगांव येथील 5, वाई येथील 121, खंडाळा 75,  रायगाव 61, पानमळेवाडी 115, मायणी 49, महाबळेश्वर 20, दहिवडी 14, खावली येथे 132 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 104 असे एकूण 834 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले. 

 बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील गोडोली (गणेश पार्क), गोडोली (यशवंत कॉलनी), मंगळवार पेठ (दस्तगीर कॉलनी), शनिवार पेठ (ओम हाईट्स) तसेच तालुका हद्दीतील चिंचणी (खालची आळी), गोवे (भैरवनाथ आळी), संभाजीनगर (आनंदनगर), लिंब (भोई आळी) या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केले आहे.

कंटेन्मेंट झोन म्हणजे ’आव जाव घर तुम्हारा !’
जिल्ह्यात कुठेही एक जरी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर तो परिसर सील करण्यात येतो अथवा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जातो. या बाधित क्षेत्रात कुणी येऊ-जाऊ नये म्हणून बंदोबस्तही नेमला जातो मात्र ’बंदोबस्त नुसता नावाला, कंटेन्मेंट झोन म्हणजे ’आव जाव घर तुम्हारा’ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणच्या बाधित क्षेत्रात कुणीही जाता-येताना दिसत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास सहजगत्या वाव मिळत आहे. सर्वांत पहिल्यांदा कंटेन्मेंट झोनबाबतचे नियम अधिकाधिक पाळणे गरजेचे असून जिल्हा प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.



error: Content is protected !!