जिल्ह्यात 12 जणांचा मृत्यू ; 251 बाधित


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आणि मृत्यूंचा आकडा झपाट्याने वाढत असून शनिवारी आणखी 12  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर 251 बाधित आढळून आले. यामुळे मृत्यूंची एकूण संख्या 226 तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 343 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज कोरोनामुक्त झाल्याने 247 जणांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

बारा कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू_

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे शिरवडे ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष, मोराळे ता. खटाव येथील 62 वर्षीय पुरुष,  सातार्‍यातील शनिवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष,   मंगळवार पेठेतील 53 वर्षीय महिला, फडतरवाडी ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, बेलवडी ता. कराड येथील 44 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 53 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी रुग्णालयामध्ये ढेबेवाडी ता. पाटण येथील 83 वर्षीय पुरुष, कराडमधील मंगळवार पेठेतील 74 वर्षीय पुरुष, सोमवार पेठेतील 68 वर्षीय पुरुष, वाई येथील खासगी रुग्णालयात सहृयाद्रीनगर येथील 56 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
फलटण : फलटण शहरातील मेटकरी गल्ली 1,  मंगळवार पेठ 5,  लक्ष्मीनगर 1,  मांडव खडक 2, मारवाड पेठ 1,  खाटीक गल्ली 1,  रविवार पेठ 1,  सोमवार पेठ 1, गुणावरे 8, कोर्‍हाळे 3, सिमेंट रोड फलटण 1, मलठण 1, ठाकूरकी  1, सस्तेवाडी 1, साखरवाडी 3, वाई : वाई शहरातील रविवार पेठ 4, सह्याद्रीनगर 2,  पसरणी मालकपेठ 2,  व्याजवाडी 3, विरमाडे 1,  जांब 4, मधली आळी 10, सोनगिरवाडी 3,  महात्माफुलेनगर 7, सिध्दनाथवाडी 1, यशवंतनगर 1, कडकी 1,  ओझर्डे -कदमवाडी 1,  शाहबाग 1,  प्राध्यापक कॉलनी 1,  शेंदूरजणे 1, रामडोहाळी 1, भोगाव 1, वाई 1, ब्रम्हशाही 1, गंगापुरी 2, गणपती आळी 1, बावधन 2, उडतारे 1, भूईज 3, सातारा : शाहूपुरी 9,  शेंद्रे 1,  निंब 6, मेघदूत कॉलनी कोडोली 3,  सातारा शहरातील शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 3,  सिव्हील 2,  शुक्रवार पेठेतील सुर्या कॉप्लेक्स 1,  मंगळवार पेठ 2,  करंजे 1,  शिवथर 1,  शाहूपुरी पोलीस स्टेशन 1,  न्यु विकासनगर खेड 1,  खावली 1,  शनिवार पेठ 2,  सदर बझार 1,  उत्तेकर नगर 1,  मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनी 1,  देगाव 1,  गोडोली  1,  पोलीस हेडक्वार्टर वसाहत 1,  कोडोली 1,  धावडशी  1 कराड : कराड शहरातील शनिवार पेठ 3, शिवाजी हौसिंग सोसायटी 1,  कोयनानगर 1,  कोल्हापूर नाका 1,  सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 5, दौलत कॉलनी 1 कार्वे नाका 1, मलकापूर 4,  बुधवार पेठ 4, शास्त्रीनगर मलकापूर 2, आगाशिवनगर 3, बनवडी 2,  रेठरे 1,  श्रध्दा क्लिनिक कराड 3,  मार्केट यार्ड कराड 2,  मंगळवार पेठ 1, शनिवार पेठेतील उर्दू शाळेजवळ 1, रुक्मिणी इस्टेट 1,  किवळ  2, काले 3, कोळे 1, म्होप्रे 1, उब्रंज खालकरवाडी 1,  गोळेश्वर 1, कराड 2, जखिणवाडी 6, शेरे 1, कराड शहर पोलीस  2, गोटे 4, वडगाव हवेली 3, खुबी 1, विद्यानगर 1, गोवारे 1,  कोयना वसाहत 2,  हिंगनोळे 1, पाटण :  मालदन 2, महाबळेश्वर :   देवळी 1, कोरेगाव : सोळशी नायगाव 1, वाठार किरोली 1,  कोरेगाव 1, करंजखोप 3,  विखळे 1, गिघेवाडी (पिंपोडे) 1, पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, खटाव : मोरोळे-मायणी 1, फडतरवाडी 1, जायगाव 3, मायणी 3,  वडूज 1, ज्योतिबा मंदिर गुंडवाडी 1, माण : देवापूर 1, म्हसवड 3,  वरकुटे 1, जावळी : मोरघर 1, खंडाळा :  पाडळी 1, लोणंद 1, शिरवळ 12,  नायगाव 1, खंडाळा 2, झगलवाडी 1, इतर जिल्हा- ताडदेव (मुंबई) 1, जेजूरी (पुणे) 1, पेठ वडगाव (हातकलंगणे-कोल्हापूर)1, रेठरे (वाळवा-सांगली) 1,  अंबिकानगर (सांगली) 1 असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आणखी 251 जण बाधित
शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 251 जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी 37 बाधितांचा तपशील प्राप्त झाला असून कोरोनाबाधित अहवालामध्ये महाबळेश्वर : भेकवली 1, महाबळेश्वर 13, राजणवाडी  1, तापोळा 1, कराड : कोळे 1, वाई : कन्हुर 1, खटाव : गुरसाळे 1, कोरेगाव : कोरेगाव 2, माण : म्हसवड 1, खंडाळा : पळशी 3, खंडाळा 2, नायगाव 4, शिरवळ 4, जावळी : नेवेकरवाडी 2 नागरिकांचा समावेश आहे. मात्र 214 कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होऊ शकला नाही. 

247  नागरिकांना डिस्चार्ज
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 1, कराड तालुक्यातील 64, खंडाळा तालुक्यातील 30, खटाव तालुक्यातील 16, कोरेगांव तालुक्यातील 20, महाबळेश्वर तालुक्यातील 1, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 29, सातारा तालुक्यातील 28, वाई तालुक्यातील 51 नागरिकांचा समावेश आहे. 

434 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 13, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12,  वाई येथील 44, शिरवळ 40, रायगाव 45, पानमळेवाडी येथील 57,  महाबळेश्वर येथील 65,  खावली 85, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 73 अशा एकूण 434 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील रविवार पेठ (कैकाड गल्ली),देवी चौक (संजय प्राईड),मंगळवार पेठ, गोडोली (कृष्णकुंज अपार्टमेंट, स्वराज्यनगर),यादोगोपाळ पेठ , रामाचा गोट तसेच तालुका हद्दीतील नेले ( टिळेकर वस्ती),शाहूपुरी (करंजे तर्फ म्हसवे रोड), शाहुपुरी (करंजे तर्फ जैन कॉलनी), कोडोली (साफल्य हौ. सोसायटी),कोडोली(शिवाजीनगर),क्षेत्रमाहुली(बेघर वस्ती),शाहुपुरी (करंजे तर्फ शिवालय अपार्टमेंट),समर्थनगर (लोकमान्य कॉलनी),खेड (शिवनगर हौ. सोसायटी,कृष्णानगर),खेड (आदित्य पार्क,अपार्टमेंट),खेड(शिवांजली हौसिंग सोसायटी), अतीत (लोकमान्य चौक),भरतगाववाडी(एसटी स्टँड परिसर),खेड(शुभमनगर,वनवासवाडी), या परिसरात प्रांत मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील कोरोनाबाधित
राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा शुक्रवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.रात्री उशिरा त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाळासाहेब पाटील यांची तब्येत ठीक आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. काळजी करण्याची गरज नाही. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. तर संपर्कात आलेल्या नागरिकांनी कोरोनाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन सहकार मंत्री श्री पाटील यांनी केले आहे.
error: Content is protected !!