जिल्ह्यात 1245 पॉझिटिव्ह; 779 कोरोनामुक्त

दिवसभरात 58 कोरोनाबाधित तर तिघांचा मृत्यू

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाचा कहर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.  शुक्रवारी जिल्ह्यात दिवसभरात 58 जण पॉझिटिव्ह आढळूून आले. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1245 इतकी झाली असून 22 जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यंत 779 जण घरी परतले आहेत.  दरम्यान, शुक्रवारी आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 51 वर  पोहोचली आहे. 


गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधितांची माहिती पुढील प्रमाणे.

कराड तालुक्यातील मारुल ह. ता. पाटण येथील 35 वर्षीय पुरुष, तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती, माण तालुक्यातील, कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75,42 वर्षीय महिला व 17,15,22,53 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील आदंरुड येथील 52 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील, करहर येथील 52 वर्षीय् महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15,19,70,26,23 वर्षीय महिला व 12,48,58,60,27 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19, 47 वर्षीय पुरुष व 62, 60 वर्षीय महिला, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, सातारा येथील भंडारी प्लाझा, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळ पेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 
दरम्यान आज शुक्रवारी रात्री उशिरा पुणे येथून आलेल्या अहवालानुसार 56 जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. 
आणखी 22 जण कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयात व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून कोरोनातून बर्‍या झालेल्या 22 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये  कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष, नायगाव येथील 40 वर्षीय महिला, वय 14 व 15 वर्षीय युवती, करंजखोप येथील 40 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवक, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 39 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील वडगांव येथील वय 20 व 44 वर्षीय महिला,  तारुख येथील 24 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला. बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष., फलटण तालुक्यातील शेर्‍याचीवाडी आनंदगाव येथील 38 वर्षीय महिला, शेरेवाडी (हिंगणगाव) येथील वय 61 व 32 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगा, फलटण शहरातील रविवार पेठेतील 3 वर्षीय बालक., खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष,वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74  वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथील 65 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
तीन जणांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि शिरवळ ता. खंडाळा येथील 83 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच गुरुवार दि. 2 जुलै रोजी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील सातारा तालुक्यातील लिंब येथील 56 वर्षीय पुरुषाचा सारीने मृत्यू झाला होता. त्याच्या घशातील नमुना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवालही कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. 
358 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 32, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 41, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 64, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथून 6,  ग्रामीण रुग्णालय वाई येथून  11,  शिरवळ येथून 39, रायगाव येथे 38, पानमळेवाडी येथून 40, मायणी येथून 11, महाबळेश्वर येथून 3, पाटण येथून 9, दहिवडी येथून 40, खावली येथून 24 अशा एकूण 358 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
error: Content is protected !!