जिल्ह्यात 25 कोरोनाबाधित, 22 जण कोरोनामुक्त


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 25 नागरिकांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने बाधितांची संख्या 1361 वर पोचली आहे. तसेच 22 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यातील एकूण 813 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


बाधित अहवाल आलेल्यांची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे
सातारा तालुक्यातील  जिहे येथे 1, दौलतनगर येथे 1, अपशिंगे येथे 1, सातारा शहरात कारागृह येथे 3, रविवार पेठ येथे 3, बुधवार पेठ येथे 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 3 कर्मचारी,कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथे 1, चंचली येथे 1, कोरेगाव शहर येथे 2, आसनगाव येथे 1 ल्हासूर्णे येथे 1, वाई तालुक्यातील आसले येथे 1, कराड तालुक्यतील तारुख येथे 3, शामगाव येथे 1, येळगाव येथे 1 अशा एकूण 25 नागरिकांचा समावेश आहे.

22 नागरिकांना डिस्चार्ज
  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बऱ्या झालेल्या 22 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बऱ्या होवून घरी सोडलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील तारुख येथील वय 76,22, 27,28,48,50 व  21 व 22 वर्षीय पुरुष आणि 25 व 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष,  येळगाव येथील 53 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 32 वर्षीय महिला आणि 4 वर्षीय बालक, जखीणवाडी येथील 19 वर्षीय युवक, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष , वाई तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील 45 वर्षीय महिला.,
 खटाव तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला आणि वय 24 व 26 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

411 नागरिकांचे नमुने तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यथील 70, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 65, वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 48, कोरोना केअर सेंटर रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 10, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 24,दहिवडी येथील 39, खावली येथील 15 अशा एकूण 411 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 
error: Content is protected !!