जिल्ह्यात 396 पॉझिटिव्ह; नऊ जणांचा मृत्यू



सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोनाचा मार्च महिन्यापासून सुरू असलेला कहर काही थांबायचं नाव घेईना.समूह संसर्ग आणि चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. आज बुधवारी आणखी 396 जण कोरोनाबाधित आढळले तर नऊ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, दिवसभरात 209 जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

नऊ बाधितांचा मृत्यू  
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष तसेच  कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.

मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:  
जावली: मेढा 2, कुडाळ 2, मोरघर 1 सातारा: राजेपूरा पेठ 4, शनिवार पेठ 12, निगडी 6, विलासपूर 6, गोडोली  3, फॉरेस्ट कॉलनी 3, कमानी हौद 1, बनघर 1, सातारा 11, विसावा 1, राजेवाडी निगडी 1, बोरगाव 1, दौलतनगर 2, सदरबझार 5 ,  शाहूपुरी 2,  करंजे 1, कामटी 1, विठ्ठल नगर 1, कोडोली 1, अंबेदरे 1, पाल 1,गुरुवार पेठ 3, बोरखळ 1, सातारा पोलीस 1,  वाघदेवी मंदिर 1, संगमनगर 1 खटाव: जयराम स्वामी वडगाव 1, बनपूरी 2, आंबवडे 1, मायणी 2, खटाव 1,  गोरेगाव 1 वाई: फुलेनगर 1, एकसार 1, सोनगिरीवाडी 1, शेदुजेर्णे 2, कानेहर 1, दत्तनगर 2, उडतारे 6, खालची बेलमाची 3, सह्याद्रीनगर 3, गणपती आळी 3, शहाबाग 5, बावधन 6, सोनगिरीवाडी 5, रविावार पेठ 1, सुरुरु 1, धरमपुरी 9 पाटण: पाटण 8, धामनी ब्लॉक पाटण 1, गारवडे 4, तळमावले 1, धामणी 1,  रामसितेवाडी 1, सणबूर 3 माण: महाबळेश्वरवाडी 1 माण : 1, जाधव स्ती आंधळी 1 कराड: रविवार पेठ 2, बुधवार पेठ 6, शनिवार पेठ 9, गुरुवार पेठ 1, कराड 4, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 2, उंब्रज 2, वाखन रोड 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, शुक्रवार पेठ 2, मसूर 5, शनिवार पेठ 2, सोमार्डी 1, शिरवडे रेल्वे स्टेशन 1,  तांबवे 1,  मुंडे 1, गोळेश्वर 1, सुपने 1, वाठार निंबळक 1, कोयना वसाहत 2, किवळ 1, वडगाव हवेली 2, दुशेरे 1, मलकापूर 3, जाखीनवाडी 1,  कर्वे नाका 2, पोटाळे 1, बनवडी 1, कोडोली 1, किवळ 1, रेठरे बु 1, काले 2, मोपारे 3,  ओगलेवाडी 1, बनवडी 1, रुक्मिणीनगर 1 महाबळेश्वर: पाचगणी 7, गुटाड 1, भेकवडी 6, नगरपालिका 1, मोहल्ला स्कूल 1, हरिजन सोसायटी 8, गवळी मोहल्ला 2, डॉ. साबणे रोड 1 फलटण: पोलीस कॉलनी 1, चव्हाणवाडी 1, कांबळेश्वर 1, मलटण 2, राजुरी 1, निंभोरे 1, नाईकबोमवाडी 1,  फलटण 1, साखरवाडी 2. खंडाळा:  बाधे 2, शिवाजी कॉलनी शिरवळ 1,  शिंदेवाडी 9, शिरवळ 2, खंडाळा 3, झगलवाडी 1, निप्रो कंपनी 1, लोणंद 2, गोरेगाव 2 कोरेगाव: सोळशी 1, पिंपोडे बु 3, रहिमतपूर 4, घीगेवाडी 1, गुजरवाडी 1,  चिमणगाव 1, देवूर 1, पिंपोडे 2, जाधवाडी 1, वाठार किरोली 6, नलवडेवाडी 5, शांतीनगर 4, आझाद चौक 5, आरफळ कॉलनी 8, संभाजीनगीर 2,  करंजखोप 1, असे बाधित आढळून आले आहेत

आणखी 396 जण बाधित
बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 396 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. 

209 जण कोरोनामुक्त
जावली:7, कराड: 41, खंडाळा: 47,खटाव:16,कोरेगांव:12,महाबळेश्वर:1, माण:6, पाटण:10, फलटण: 7, सातारा:38, वाई: 24  अशा 209 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.  
               
596 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 80, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 5, वाई येथील 81, खंडाळा येथील 26, रायगाव 69,  मायणी येथील 101, महाबळेश्वर येथील 63, पानमळेवाडी 8, पाटण येथील 14, खावली येथील 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 अशा एकूण 596  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

 बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील करंजे पेठ (वरद विनायक रेसिडेन्सी),मंगळवार पेठ, गुरुवार पेठ (हनुमान मंदिर शेजारी), शनिवार पेठ (प्रथमेश गॅलेक्सी),केसरकर पेठ, सदरबझार (शिवकृपा अपार्टमेंट),बसाप्पा पेठ(अविष्कार बंगला),गुरुवार पेठ, राजसपुरा पेठ,शनिवार पेठ,तसेच तालुका हद्दीतील नांदगाव (ग्रामपंचायत परिसर),मालगांव (खडखडी परिसर),वर्णे (टपार वस्ती),शाहूपुरी (करंजे तर्फ वसुंधरा गार्डन),(नंदनवन अपार्टमेंट),कोडोली (तांगडे आळी),गजवडी (गावठाण) ,खोडद (मागास वस्ती),नागठाणे (पाटील वाडा परिसर), अपशिंगे (माळावरील वस्ती)या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.

……………………………………………………………………………………………………………………………….

एकूण आकडेवारी
कोरोनाबाधित – 8671
कोरोनामुक्त    – 4658
एकूण मृत्यू      –  269
उपचार सुरू     -3744

error: Content is protected !!