जिल्ह्यात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू ; 186 पॉझिटिव्ह


एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण; 67 जणांना डिस्चार्ज

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात एका दिवसात आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे 186 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली. दरम्यान, चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे हे जरी खरे असले तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात आणखी पाच कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान, आज 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

पाच बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे कुमठे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला, परखंदी ता. वाई येथील 72 वर्षीय पुरुष, कुस बु. ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये सोनगांव, क्षेत्रमाहुली ता. सातारा येथील 62 वर्षीय महिला अशा पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

सोमवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
खंडाळा : जवळे येथील 20 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, पाडेगाव येथील 38, 70, 60 वर्षीय महिला, विंग येथील 55, 70, 36, 26, 26 वर्षीय महिला, 65, 52, 25 वर्षीय पुरुष, बालाजी विश्व, शिरवळ येथील 26 वर्षीय पुरुष, पळशी येथील 3 वर्षाची बालिका, जवळे येथील 38, 48 वर्षाची महिला, स्टार सिटी, शिरवळ येथील 42 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, खंडाळा येथील 64 वर्षाचा पुरुष, लोणंद येथील 65 वर्षीय महिला (मृत्यू), जावली : रायगाव येथील 43, 36 वर्षीय पुरुष, 34, 32 वर्षीय महिला, पुणवडी येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव : बनपुरी येथील 51 वर्षीय पुरुष, वडूज येथील 45, 20, 22 42 22, 50 वर्षीय महिला, 52, 24, 61, 60, 20, 47, 31 वर्षीय पुरुष, पाचवड येथील 40 वर्षीय पुरुष, विसापूर येथील 13 वर्षाची युवती, 13 वर्षाचा युवक, 38, 40 वर्षाचा पुरुष, 24, 37, 16 वर्षाची महिला, निढळ येथील 31 वर्षीय महिला, पाटण : कासरुंड येथील 35, 17 वर्षीय महिला, 12 वर्षाची युवती, निगडे येथील 45, 78 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, जाधवाडी, चाफळ येथील 25,  2 वर्षाची बालिका, चाफळ येथील 61 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, नेरले येथील 7 वर्षाची बालिका, 50, 20, 48 महिला, 20 वर्षाचा युवक, 37, 25 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष, खाले येथील 50 वर्षीय महिला, वाई : पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष, 18, 16 वर्षाचा युवक, 45 वर्षाची महिला, बोरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, रेणावले येथील 28 वर्षीय पुरुष, सिध्दांतवाडी 30 वर्षीय महिला, काझी कॉलनी, वाई 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 40 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील 45 वर्षीय पुरुष, सोनगीरीवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, फलटण : कोळकी येथील 28 वर्षीय पुरुष, राजाळे येथील 42 वर्षीय पुरुष, कराड : रविवार पेठ, कराड येथील 72 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 33, 40 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 31, 57, 25 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचे बालक, 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 35, 23 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 22 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 52, 35 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 30 वर्षीय पुरुष, शिवडे येथील 32 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 46 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, सातारा : सदरबझार, सातारा येथील 27, 41, 67, 30, 32, 50, 50 वर्षीय महिला, 68, 70, 29, 62, 35, 52 वर्षीय पुरुष, करंजे/खैरमली येथील 57 वर्षीय पुरुष, वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, सातारा येथील 29 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, जिहे येथील 38, 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 35 वर्षीय महिला, महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील 35 वर्षीय पुरुष, गोडोली, पाचगणी येथील 23 वर्षीय महिला, कोरेगाव : सासुर्णे येथील 58 वर्षीय महिला असे कोरोनाबाधित आढळले.

आणखी 186 जण बाधित
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 186 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील रात्री प्राप्त होऊ शकला नाही.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
वाई : वाई येथील 52 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 22 वर्षीय पुरुष, 20 व 32 वर्षीय महिला व 9 वर्षाची बालीका, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, कराड : तारुख येथील 26 वर्षीय महिला 2 वर्षाची दोन बालके, मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष, यादववाडी (मसुर) येथील 43 वर्षीय पुरुष, कवटे येथील 35 वर्षीय पुरुष, कारवडी येथील 28 वर्षीय पुरुष, सातारा : जीहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10 व 8 वर्षाची बालके, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला व 23 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 32 वर्षीय महिला, शहापूर येथील 28 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा : अष्टविनायक ग्लास फॅक्ट्री येथील 18 वर्षीय तरुण, जावली : पुनवडी येथील 39, 42, 59, 33, 31, 29, 93, 50, 19, 64, 30, 34, 43, 38, 23, 50, 23, 43 वर्षीय पुरुष व 56, 26, 60, 50, 59, 35 वर्षीय महिला व 7,12,7,5 व 7 वर्षाच्या बालीका, 18 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण, 3 व 10 वर्षाचा बालक, सायगांव येथील 17 वर्षीय युवक, 52 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय बालक, 11 वर्षीय बालीका व 35 वर्षीय महिला, दापवाडी येथील 29 व 56 वर्षीय पुरुष, माण : गोंदवले बु. येथील 21 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष अशा 67 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.

597 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 40, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 12, कोरेगांव येथील 12, वाई येथील 46, शिरवळ येथील 17, रायगाव 26, पानमळेवाडी 93, मायणी 42, महाबळेश्वर 10, पाटण 54,खावली येथे 74 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 90 अशा एकूण 597 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील सदाशिव पेठ, बुधवार पेठ तसेच तालुका हद्दीतील वर्ये, सोनगाव (सं. निंब), पाटखळ, कुस बुद्रुक, क्षेत्रमाहुली या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केले आहे.





error: Content is protected !!