जिल्ह्यात 58 जण बाधित ; चौघांचा मृत्यू


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील विविध रुग्णालय व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 58 नागरिकांचा अहवाल कोरानाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान, चार बाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 55 झाली आहे.

शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 51, प्रवास करुन आलेले 4, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 1  असे एकूण  56 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 36 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. तसेच खटाव  तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
बाधितांमध्येे महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथील 28 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील उंब्रज येथील 23 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 41 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 7,12,16,38,68,42,40,32,20 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय दोन युवती व 25 वर्षीय महिला मलठण येथील 39 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील 24 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी येथील 30 व 23 वर्षीय पुरुष, देशमुख आळी येथील 35 व 45 वर्षीय महिला, लोणंद मधील मर्‍याची  वाडी येथील 34 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील जिहे येथील 49,36,20,8,68,43,61,81,62 वर्षीय पुरुष व 42,57,4,30,19,3,10,32,70,55 वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष, धावली येथील 17 वर्षीय पुरुष, पानमळेवाळी येथील 43 वर्षीय महिला, माण तालुक्यातील कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील मलवडी येथील 24 वर्षीय पुरुष, मोरगीरी येथील 33 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 16 व 24 वर्षीय महिला, बेलवडे येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोकूळ येथील 18 वर्षीय युवक, मारुल येथील 35 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील धर्मपूरी येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
शनिवारी प्राप्त अहवालानुसार 10 कोरोनाबाधित आढळले असून यामध्ये वाई तालुक्यातील उडतरे येथील 1, पसरणी येथील 1, वाई येथील 2, बदेवाडी येथील 1, सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथील 1, कराड तालुक्यातील कार्वेनाका येथील 25 वर्षीय महिला, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील शेणवडी येथील 26 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील वाझोली येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. 
चार बाधितांचा मृत्यु
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे खटाव  तालुक्यातील मुंबई वरून प्रवास करून आलेला  पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय ( सारीची रुग्ण ) महिला तसेच माण तालुक्यातील पळसवडे येथील 65 वर्षीय पुरुषाचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाबाधित म्हणून अहवाल आलेल्या रुग्णास खाजगी हॉस्पिटलमधून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचारासाठी पाठविले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.  त्याचबरोबर माण तालुक्यातील खडकी येथील 75 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा कोरोना हेल्थ केअर सेंटर, मायणी येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. 
आणखी 5 जणांना डिस्चार्ज
कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथून 2, कारोना केअर सेंटर वाई येथून 2 व कारोना केअर सेंटर खावली येथून 1 असे एकूण 5 रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.  यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवळवाडी येथील 49 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील लिंब गोवे येथील 36 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय युवक, वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय् युवक व एकसर येथील 25 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
339 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 71, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथून 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथून 3, ग्रामीण रुग्णालय वाई येथून  41, शिरवळ येथुन 37, रायगांव येथून 36, पानमळेवाडी येथून 19, महाबळेश्वर येथून 3, खावली 33 असे एकूण 339  नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

सातारा तालुक्यातील बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा तालुक्यातील जिहे, लिंब तसेच सातारा शहरातील गोडोली, प्रतापगंज पेठ आणि यादोगोपाळ पेठ या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरिता असणारी वेळ जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. तसेच जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.







error: Content is protected !!