जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू ; 202 कोरोनाबाधित


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात  शनिवारी दिवसभरात  202 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली. दरम्यान, चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे हे जरी खरे असले तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात आणखी सहा कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान, आज 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे येवती  ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, झिरपवाडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष तसेच सातारा येथे खासगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ येथील 25 वर्षीय पुरुष, परखंदी, ता. वाई येथील 81 वर्षीय महिला व गोडोली ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला, वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सोनगीरवाडी ता. वाई येथील 35 वर्षीय महिला अशा सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
वाई :
वाई येथील 53,37,34,48 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, 45,18,26,70,30,36,46 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालीका, गणपती आळी येथील 57 वर्षीय पुरुष, यशवतंनगर येथील 59 वर्षीय पुरुष, रविवार पेठ  येथील 34 वर्षीय पुरुष, खानापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पेटकर कॉलनी येथील 54 वर्षीय पुरुष, काझी कॉलनी येथील 22 वर्षीय महिला, सिध्दनाथवाडी येथील 34 वर्षीय महिला, शहाबाग येथील 32,35 वर्षीय पुरुष, जांब येथील 56 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर येथील 33 वर्षीय पुरुष,  बावधन येथील 16 वर्षीय युवती, कवठे येथील 59,39,35, वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका 10 वर्षीय बालक व 38 वर्षीय  पुरुष, परखंदी येथील 9 वर्षीय बालक, कराड : येवती येथील 62, 53 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय युवक, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालीका, कोयना वसाहत येथील 42 वर्षीय महिला,सजूर येथील 60 वर्षीय पुरुष,  वडगाव येथील 43 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 28 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 37 वर्षीय पुरुष, शेरे येथील 48,70 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 36 वर्षीय पुरुष,  उंब्रज येथील 32 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 14 वर्षीय बालीका, म्हासोली येथील 26 वर्षीय महिला, कालवडे येथील 66 वर्षीय  पुरुष 20 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51,44 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक येथील 38,62,56 वर्षीय  पुरुष 46 वर्षीय महिला, सैदापूर येथील 37 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 24,53,25 वर्षीय पुरष 60,40 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 95 वर्षीय महिला 32 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 48 वर्षीय पुरुष, खंडाळा :  पळशी येथील 60 वर्षीय महिला, तळेकर वस्ती विंग येथील 27,40 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, शिरवळ येथील 79,24,32,41,31,42, वर्षीय पुरुष व 5,10,13 वर्षीय बालक 8 वर्षीय बालीका 60,50,29,31,60,36,29,28,27,56,34, वर्षीय महिला 5 वर्षीय बालीका, लोणंद येथील 26,66 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण 26 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी अहिरे येथील 46 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, मोर्वे येथील 32 वर्षीय पुरुष, सातारा : रामकृष्णनगर येथील 24, 45,48 वर्षिय पुरुष व 11 वर्षीय बालक, 42,42,42,20 वर्षीय महिला व  13 वर्षीय बालीका व 18 वर्षीय तरुणी, कण्हेर येथील 27, 29,29 वर्षीय महिला,34,40,41,40 वर्षीय पुरुष व 4 व 7 वर्षीय बालक,शेंद्रे येथील 22 वर्षीय महिला,  कुस येथील 65,32 वर्षीय महिला 46 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 30,26 वर्षीय पुरुष 45 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी  सोसायटी संभाजीनगर येथील 63,39,46, वर्षीय पुरुष व 12 वर्षीय बालक 32,71,43 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालीका, कामाठीपुरा येथील 20 वर्षीय पुरुष, कोरेगाव :  कोरेगांव येथील 28 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 25,20,40,70,55 वर्षीय महिला 15 वर्षीय बालक व 47 वर्षीय पुरुष, वाघोली येथील 47 वर्षीय  पुरुष, खटाव :  थोरवेवाडी येथील 20 वर्षीय पुरुष, चितळी येथील 25 वर्षीय महिला, उंबार्डे येथील 70 वर्षीय पुरुष, फलटण : मलठण येथील 44 वर्षीय पुरुष, 40,60 वर्षीय महिला, मुंजवडी येथील 30,65 वर्षीय पुरुष, जिंती नाका येथील 59,20 वर्षीय पुरुष 12 वर्षीय बालक 17,16 वर्षीय युवती 35 वर्षीय महिला, रामबाग कॉलनी येथील 62,38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक, स्वामी विवेकानंद नगर येथील 64 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष,  महाबळेश्वर :  गोडवली येथील  14 वर्षीय तरुण, 36, 65,48,22 वर्षीय महिला, 25,24 वर्षीय पुरुष, बेल एयर पाचगणी येथील 31 वर्षीय महिला,  पाचगणी येथील 27 वर्षीय महिला, जावली : दुदुस्करवाडी येथील 69,32,45,35,60,18,72,49,72,36 वर्षीय पुरुष व 14,14,58,38,23,40,22,29,20,52,72 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक, पाटण : सनबुर येथील 38 वर्षीय पुरुष, पाटण येथील 28 वर्षीय महिला 55 वर्षीय पुरुष, तारळे येथील 4 वर्षीय बालक 60 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 41 वर्षीय पुरुष, निसारी येथील  58,80 वर्षीय पुरुष असे कोरोनाबाधित आढळले.

आणखी 202 जण बाधित
शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 202 जण कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 33 बाधितांचा तपशील प्राप्त झाला आहे. मात्र उर्वरीत 169 बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. जिल्ह्यातील विविध खासगी  रुग्णालयात दाखल असलेल्या (यामध्ये शिरवळ  येथील 21, खंडाळा येथील 2, सातारा येथील व्यंकटपुरा 1, निगडी 1, ग्रीनसीटी भूविकास बँक 1, अंगापूर 1, त्रिमर्ती मंगल कार्यालय 1, कारी 1, देगाव शिरगाव 1 अशा 33 जणांची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित आढळले.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
महाबळेश्वर :
गोडवली येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, खंडाळा : लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, सातारा : जिहे येथील 70 वर्षीय महिला, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील  39,48,41 वर्षीय महिला 42 वर्षीय पुरुष,  वेंकटपुरा पेठ येथील 64 वर्षीय महिला, कारंडी येथील 65 वर्षीय महिला, देगाव फाटा येथील 34 वर्षीय महिला, गजेगाव येथील 25 वर्षीय महिला, कण्हेर येथील  65 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, तामजाई नगर येथील 5 वर्षीय बालीका,  सदरबझार येथील 21,27,30,25 वर्षीय पुरुष व 40,43 वर्षीय महिला, नवीन एमआयडीसी येथील 2 वर्षीय बालीका, शिवनगर एमआयडीसी येथील 58,30, 28,45 वर्षीय पुरुष 13 वर्षीय बालक व 25,55 वर्षीय महिला, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष, कोरेगांव : कालवडी येथील 55 वर्षीय महिला, कराड : वान्याचीवाडी  येथील 62 वर्षीय महिला, मिरगाव येथील 31 वर्षीय महलिा, मलकापूर येथील 32,24 वर्षीय पुरुष, किवळ येथील 69 वर्षीय पुरुष,  कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय डॉक्टर 31 वर्षीय महिला,  टेंभू येथील 40 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 61 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 31 वर्षीय महिला, पाटण : महिंद येथील 58 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय पुरुष, कालगांव येथील 20 वर्षीय तरुणी, खाले येथील 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय तरुण, वाई :  दत्त नगर येथील 32 वर्षीय पुरुष, शेंदुर्जणे येथील 40 वर्षीय पुरुष अशा 48 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

559 जणांचे नमुनेे तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  41,  कोरेगांव येथील 22, वाई येथील 22, खंडाळा येथील 95, रायगाव 30, पानमळेवाडी 96, मायणी 58,  व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 86 अशा एकूण 559 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले. 

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील शाहूनगर (विद्यानगर), गोडोली (समाजमंदिराशेजारी) तसेच तालुका हद्दीतील शाहूपुरी (सह्याद्री पार्क), चिंचणेर वंदन  (कदम आळी), शिवथर (पाडळी रस्ता), नागठाणे (चौंडेश्‍वर मंदिर परिसर),  लिंब (विठ्ठलवाडी), अतित, कोंडवे (मंजुळा कॉलनी) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.





error: Content is protected !!