जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू ; 174 बाधित


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा):  कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यूंची संख्या वाढत असून सोमवारी आणखी सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर नव्या 174 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 5 हजार 939 वर पोहोचली असून आजपर्यंत 180 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, आज कोरोनामुक्त झाल्याने 76 जणांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. 
 
सहा बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे माळी आळी, लोणंद ता. खंडाळा येथील 60 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, कोळकी ता. फलटण  येथील 75 वर्षीय महिला, सातारा येथील 68 वर्षीय महिला तसेच सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये पांढरवाडी (जाधववाडी) ता. माण येथील 72 वर्षीय महिला, वाई येथील खासगी हॉस्पिटल येथे बावधन ता. वाई येथील 80 वर्षीय महिला, अशा सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

रविवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे: 
पाटण :
निसरे येथील 28 वर्षीय पुरुष, कराड : काले येथील 47 वर्षीय पुरुष, ओंढ येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, गोटे मुंडे येथील 70 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 62 वर्षीय पुरुष, विरवडे येथील 38 वर्षीय महिला, चोरे येथील 55, 12 वर्षीय महिला, धावरवाडी येथील 28, 62 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 22, 40, 55, 42 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 30 वर्षीय महिला, सातारा : संगमनगर, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 29 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 37 वर्षीय पुरुष, कोंढवे येथील 34 वर्षीय महिला, अतित येथील 24 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 24 वर्षीय महिला, अतित येथील 62 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 46 वर्षीय पुरुष, शेंद्रे येथील 43 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 48 वर्षीय महिला, करंजे सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, यादवगोपाळ पेठ येथील 44 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 48 वर्षीय पुरुष, बारवकरनगर येथील 56 वर्षीय महिला, यादवगोपाळ पेठ 39 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 65 वर्षीय महिला, सासपडे येथील 30 वर्षीय पुरुष, विकासनगर येथील 44 वर्षीय पुरुष, खेड येथील 35 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ, सातारा येथील 70, 28, 32 वर्षीय पुरुष, शाहुपूरी येथील 42, 15, 15 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, मतकर कॉलनी, सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, खटाव : वडूज येथील 50, 55 वर्षीय पुरुष, मायणी येथील 8 वर्षाची मुलगी, 30, 45, 45, 80 वर्षीय महिला, 80, 20 पुरुष, पुसेगाव येथील 63 वर्षीय पुरुष, ऐनकुळ  येथील 23 वर्षीय पुरुष, कोरेगाव : कोरेगाव येथील 44 वर्षीय पुरुष, आसनगाव  येथील 65 वर्षीय महिला, वाई : चिंदवली येथील 50 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी येथील 58 वर्षीय महिला, चाहूर येथील 55, 78वर्षीय पुरुष, रविवार पेठ 33 वर्षीय पुरुष, खानापूर 52 वर्षीय पुरुष,   परखंदी येथील 57, 25 वर्षीय महिला, भोगाव येथील 51 वर्षीय पुरुष, माण : पांढरवाडी (जाधववाडी) येथील 44, 21, 39, 74 वर्षीय पुरुष, 41, 15, 29 वर्षीय महिला, 12, 8 वर्षीय मुली, 3 वर्षाचा बालक, शिवरी येथील 40 वर्षीय पुरुष, खंडाळा : मोह तर्फ शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 90, 60 वर्षीय महिला, पडवळवाडी येथील 34 वर्षीय महिला, जावली : कुडाळ येथील 71 वर्षीय पुरुष, रागेघर येथील 55 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 57 वर्षीय पुरुष, फलटण : विडणी येथील 66, 11, 13, 15 पुरुष, 14, 30, 35, 50  वर्षाची महिला,   गुणवरे येथील 32, 20, 62  वर्षीय पुरुष, गिरवी येथील 35, 40, 62, 12  महिला, 10 वर्षाचा बालक, 35 वर्षीय पुरुष, तडवळे येथील 36 वर्षीय महिला, 11 वर्षीय युवक, 9 वर्षाचा बालक, 22 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुष, कोल्हापूर शिवाजी पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, अहमदनगर  येथील 31 वर्षीय पुरुष यांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे.

आणखी 174 जण बाधित
सोमवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 174 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र त्यांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
जावळी :
दुदुस्करवाडी येथील 4 पुरुष,  5  महिला, कराड : आगशिवनगर येथील 2 महिला, 1 पुरुष, मलकापूर येथील  2 पुरुष, 1 महिला, कोयना वसाहत येथील 2 पुरुष, मंगळवार पेठ कराड येथील 1 पुरुष, रविवार पेठ कराड येथील 1 पुरुष, रविवार पेठ कराड येथील 1 पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 1 पुरुष व 1 महिला, उंब्रज येथील 2 पुरुष, रेठरे बु येथील 1 पुरुष, विद्यानगर येथील 1 महिला, सैदापूर येथील 1 महिला, करवडी येथील 1 महिला, कालवडे येथील 1 महिल, मुंडे येथील 2 महिला, खासगी रुग्णालय 1 पुरुष,गोवारे येथील 1 महिला, बुधवार पेठ कराड येथील 3 महिला, मुजावर कॉलनी कराड येथील 3 पुरुष, कार्वे येथील 2 महिला, 1 पुरुष, तांबवे येथील 1 महिला, 1 पुरुष, इंदोली येथील 3 पुरुष, करवडी येथील 1 महिला, खंडाळा : शिरवळ येथील 1 पुरुष, विंग येथील 1 महिला, 1 पुरुष, खंडाळा येथील 1 महिला, खटाव : वडूज येथील 1 महिला, महाबळेश्वर : गोडोली, पाचगणी येथील 1  महिला, पाचगणी येथील 2 पुरुष, 2 महिला, पाटण : तारळे येथील 3 पुरुष, नवसारी 1 महिला, नेरले येथील 2 महिला, निगडे येथील 1 पुरुष, आंब्राग येथील 1 पुरुष, जाधवाडी चाफळ येथील 1 महिला, सातारा : दिव्यनगरी शाहुपूरी येथील 1 महिला, कामाठीपुरा, सातारा येथील 1 पुरुष, रामकृष्णनगर येथील 1 पुरुष, 2 महिला, देशमुख कॉलनी, सातारा येथील 1 पुरुष, सदरबझार, सातारा येथील 1 महिला, दैवतनगर येथील 1 पुरुष, वाई : तालुक्यातील शहाबाग येथील 3 पुरुष अशा 76 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

404 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 50, कराड यैथील 24, फलटण येथील 29, वाई येथील 72, शिरवळ येथील 40, पानमळेवाडी येथील 34, मायणी येथील 25, महाबळेश्वर येथील 10,  पाटण येथील 35, दहिवडी येथील 6 अशा एकूण 404 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील केसरकर पेठ (फोर्ट व्हीव रेसिडेन्सी), मंगळवार पेठ, गोडोली (रामरावपवार नगर), शनिवार पेठ (काळे प्लाझा) तसेच तालुका हद्दीतील शाहूपुरी (रुद्राक्ष रेसिडेन्सी), (मतकर कॉलनी), (रानमळा रोड), नागठाणे (पाडळी रस्ता), खेड (आदर्श संगम अपार्टमेंट)(जगताप आळी), कोंडवे (नम्रता कॉलनी), या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.


error: Content is protected !!