जिल्ह्यात 738 पॉझिटिव्ह, 508 कोरोनामुक्त

दिवसभरात एकाचा मृत्यू, 12 बाधित; 9 परतले घरी

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 9 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 12 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 738 झाली असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 508 झाली आहे. दरम्यान, आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असल्याने मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता 34 झाली आहे. 196 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

एका बाधिताचा मृत्यू, दोघांचे मृत्यू पश्चात नमुने पॉझिटिव्ह

सातारा येथील खाजगी रुग्णालयात निमोनियावर उपचार सुरु असलेल्या सातारा तालुक्यातील राजापुरी येथील 71 वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे. हा रुग्ण मागील महिन्यात मुंबईवरून आला होता. 
दरम्यान, रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणार्‍या 12 जणांचे नमुने कोरोनाबाधित आढळून आले असून त्यात जावली तालुक्यातील गांजे येथील 48 वर्षीय पुरुष व फलटण तालुक्यातील रविवार पेठ येथील 70 वर्षीय महिला या राहत्या घरी मृत्यू पावलेल्या 2 कोरोनाबाधितांच्या मृत्युपश्चात नमुन्यांचाही समावेश आहे. 
बाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :  सातारा : एका खाजगी रुग्णालयातील 23 वर्षीय गर्भवती महिला, शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष, कोरेगाव : पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी, फलटण : मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय सारीचा आजार झालेला पुरुष, खटाव : वडगाव येथील 57 वर्षीय महिला व बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष, पाटण : दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष, असे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
115 जणांचे अहवाल निगेटिव्ह
शनिवारी रात्री उशिरा एनसीसीएस (पुणे) यांनी 89 तर कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) यांनी 26 असे एकूण 115 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे.
35 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 16, शिरवळ येथील 13 व पानमळेवाडी येथील 6 अशा एकूण 35 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आणखी 9 जण कोरोनामुक्त 
मायणी कोविड सेंटर येथील 2, बेल एअर हॉस्पिटल (पाचगणी) येथील 3, पार्ले कोविड केअर सेंटर येथील 2, म्हसवड कोविड केअर सेंटर येथील 1 व कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 1 अशा एकूण 9 जणांना दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :  खटाव : पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, वांझोळी येथील 52 वर्षीय पुरुष, निढळ येथील 23 वर्षीय महिला,   महाबळेश्वर : कासवंड गोळेवाडी येथील अनुक्रमे 36, 62 व 12 वर्षीय महिला, कराड : वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला व 17 वर्षीय युवती, माण : दहिवडी येथील 17 वर्षीय युवक, अशा नऊ जणांना कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 


सातारा तालुक्यातील समर्थनगर मायक्रो कंटेनमेंट झोन
सातारा तालुक्यातील समर्थनगर येथे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरिता असणारी वेळ जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. तसेच जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.
























error: Content is protected !!