जिल्ह्यात 766 बाधित, 562 कोरोनामुक्त

दिवसभरात एकाचा मृत्यू, 21 जणांना बाधा; 29 जण परतले घरी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 21 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर विविध रुग्णालयांतून 29 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परतले. 21 पॉझिटिव्ह वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 766 झाली असून कोरोनामुक्तांची एकूण संख्या 562 झाली आहे. दरम्यान, एका कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला असल्याने मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता 35 झाली आहे. 148 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

वेळे येथील बाधिताचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथे वेळे (ता. वाई) येथील 50 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. 
आणखी 21 जणांना कोरोनाची बाधा
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात विविध तालुक्यांत मिळून 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे औरंगाबाद जिल्यातील  21 वर्षीय तरुण,  देहू माळवाडी ता. हवेली  जि. पुणे येथील 48 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील मालखेड  येथील 60 वर्षीय पुरुष, तारुख येथील 50 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 28 वर्षीय पुरुष, 25 व 53 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालीका, वाई तालुक्यातील बावधन (शेलारवाडी) येथील  49 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष, कोरेगांव तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण, खटाव तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष, फलटण  तालुक्यातील वडले येथील 25 वर्षीय महिला, जावली तालुकयातील  गांजे येथील 48 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील उरुल येथील 31  वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील शाहूनगर येथील 45 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुणी व वाढेफाटा येथील 67 वर्षीय पुरुष, असे 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
दोघांच्या मृत्यू पश्चात नमुन्यांसह 145 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना.
सातार्‍यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 20, कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथील 37, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय (कराड) येथील 13, उपजिल्हा रुग्णालय (फलटण) येथील 3, ग्रामीण रुग्णालय (कोरेगाव) येथील 8, वाई येथील 12, शिरवळ येथील 18, रायगाव येथील 3, पानमळेवाडी येथील 14, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 4, पाटण येथील 2 अशा एकूण 145 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई येथून प्रवास करुन आलेला पाटण तालुक्यातील गोवारी येथील 50 वर्षीय पुरुष व हावलेवाडी येथील 45 वर्षीय महिला या मृत्यू झालेल्या दोघांचा अनुमानित म्हणून मृत्यु पश्चात नमुनाही समाविष्ट आहे.
 42 अहवाल निगेटिव्ह
कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 42 जणांचे नमुने अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
आणखी 29 जण कोरोनामुक्त
विविध रुग्णालयांमध्ये तसेच विविध कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणार्‍या 29 जणांना मंगळवारी दहा दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. 
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
खटाव : 57 वर्षीय पुरुष, चिंचणी येथील 3 पुरुष व 2 महिला, सातारा : खडगुण येथील 64 वर्षीय पुरुष, वावदरे येथील 41 वर्षीय पुरुष, कारंडी येथील 25 वर्षीय महिला, जरंडेश्वर नाका येथील 23 वर्षीय महिला, महाबळेश्वर : गोरोशी (बिरवडी) येथील 43 वर्षीय पुरुष, जावली : तोरणेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, काटवली येथील 61 वर्षीय पुरुष, फलटण : साखरवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, वडले येथील 54 वर्षीय व 35 वर्षीय पुरुष, होळ येथील अनुक्रमे 58, 56 व 64 वर्षीय पुरुष, अनुक्रमे 62, 51, व 45 वर्षीय महिला, तांबवे येथील 45 व 60 वर्षीय महिला, 6 व 3 वर्षीय दोन बालके, 65 व 26 वर्षीय पुरुष, माण : दहिवडी येथील 19 वर्षीय युवक असे 29 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली मायक्रो कंटेनमेंट झोन
सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरिता असणारी वेळ जिल्हाधिकारी यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. तसेच जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना तसेच त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.


error: Content is protected !!