जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू : 220 बाधित


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात  आज मंगळवारी आलेल्या अहवालामध्ये तब्बल 220  जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर आठ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, आज 69 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले असून 432 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. 

आठ बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मल्हारपेठ, ता. पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, वाठार किरोली ता. कोरेगाव येथील  39 वर्षीय पुरुष, सह्याद्रीनगर, वाई येथील 64 वर्षीय महिला, सुरुर ता. वाई येथील 65 वर्षीय महिला तसेच खासगी रुग्णालयातील महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुष, नाकिंदा ता. महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष व गोडवली पाचगणी ता. महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरुष अशा आठ कोरोनाबाधितांंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. 

सोमवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
फलटण :
अशिंगे येथील 48 वर्षीय महिला, पाडेगाव येथील 30 वर्षीय महिला, 8 वर्षाची मुलगी, 21 वर्षीय महिला, राजुपरी येथील 34 वर्षीय करुष, कुरोली येथील 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, जिंती नाका 40 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय महिला, 18 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक, 14 वर्षीय युवक, पांढरवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, तडावळे येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, फलटण येथील 58 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय युवक, पाडेगाव येथील 34 वर्षीय महिला, सातारा : सत्वशिलनगर, संभाजीनगर, सातारा येथील 11 वर्षाचा मुलगा, 21 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, काळोशी येथील 60 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला, 7 वर्षाची मुलगी, सर्वोदय कॉलनी, सातारा येथीहल 31 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष, शाहुनगर, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 72 वर्षीय महिला, यशवंत कॉलनी, सातारा येथील 52 वर्षीय महिला, सदरबझार, सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, आंबेदरे येथील 45 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष34 वर्षीय महिला, 60, 65 वर्षीय पुरुष, ओझाले येथील 39 वर्षीय पुरुष, शाहुपूरी, सातारा येथील 53, 24 वर्षीय महिला, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 24 वर्षीय पुरुष,  56 वर्षीय महिला, खंडाळा : धनगरवाडी येथील 35 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, मोरवे येथील 40, 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, केदारेश्वर रेसिडेन्सी येथील 34 वर्षीय महिला, लोणंद येथील 52  वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 78, 29 वर्षीय पुरुष, पिसाळवाडी येथील 32  वर्षीय पुरुष, शिरवळ, पळशीरोड येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती, पाटण : तालुक्यातील मल्हारपेठ येथील 58 वर्षीय पुरुष,  करपेवाडी येथील 53 वर्षीय पुरुष, कराड : वडगाव हवेली येथील 40, 30, 21,  वर्षीय पुरुष, मुंडे येथील 76, 44 वर्षीय पुरुष, 15 वर्षाची मुलगी, म्हासोली येथील 50 वर्षाची महिला, मोहपरे 19, 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 40 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 31 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय पुरुष  35 वर्षीय महिला, 17 वर्षी युवक,20, 30 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, विकासवाडी येथील 62 वर्षीय पुरुष, कराड येथील 77 वर्षीय पुरुष, यशवंतनगर, कराड येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका येथील 63 वर्षीय पुरुष, धनवडेवाडी येथील 24 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 64 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, येथील 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 27 वर्षीय महिला, कर्वे येथील 62 वर्षीय पुरुष, जयवंत शुगर परिसर, कराड येथील 35, 30, 31, 28 वर्षीय पुरुष,  6 वर्षाचा बालक, 30 वर्षाची महिला, रेठरे बु येथील 45 वर्षीय पुरुष, कराड यैथील 35 वर्षीय पुरुष, येवती येथील 65 वर्षीय पुरुष, सुपने येथील 39 वर्षीय महिला, कराड येथील 33 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, कोरेगाव : कुमठे येथील 65, 35 वर्षीय पुरुष, 76 वर्षीय महिला, 6 वर्षाची मुलगी, महाबळेश्वर : रांजणवाडी येथील 45, 20, 49, 3536,  वर्षीय महिला, 15 वर्षाचा युवक, 23, 60 वर्षाचा पुरुष, गोडोली येथील 68 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, पाचगणी येथील 21 वर्षीय पुरुष , 35 वर्षीय महिला खटाव : मायणी येथील 33 वर्षीय महिला, येरळवाडी येथील, 45 वर्षीय पुरुष, थोरवडी येथील 6 वर्षाचा बालक, वाई : रविवार पेठ, वाई येथील 77 वर्षीय पुरुष, बावधन येथील 32 वर्षीय महिला,  माण : दहिवडी येथील 63 वर्षीय पुरुष तसेच खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये एसटी कॉलनी, सातारा येथील 35 वर्षीय महिला, खडानी येथील 36 वर्षीय पुरुष, संगमनगर खेड येथील 46 वर्षीय पुरुष, रेल्वे लाईन क्षेत्रमाहुली येथील 46 वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुकयातील मेटगुटाड येथील 60 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील देगाव येथील 23 वर्षीय महिला, कल्याणी ईस्टेट, सातारा येथील 25 वर्षीय महिला, निशिगंधा हौसिंग सोसायटी, कोडोली, सातारा येथील 58 वर्षीय महिला, कोडोली येथील 73 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील 59, 39 वर्षीय पुरुष यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. 

आणखी 220 जण बाधित
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 220 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
शारदा क्लिनिक कराड येथील 17 वर्षीय युवती 17 वर्षीय युवक  58,37 वर्षीय महिला 24,20 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक, 26 वर्षीय महिला, कासारशिरंबे येथील 14 वर्षीय बालीका, कवठे येथील 26 वर्षीय पुरुष,कालवडे येथील 58,50 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 40 वर्षीय पुरुष,कार्वे येथील 6 वर्षीय बालक, शामगाव येथील 34 वर्षीय पुरुष, अटके येथील 90,59 वर्षीय पुरुष  82, 64, 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील  53 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल येथील 51 वर्षीय पुरुष, पाटण : नेरले येथील 55 वर्षीय महिला, अंब्रग येथील 55, 34, 23 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालीका 8 वर्षीय बालक 55 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 42,24, 54 वर्षीय पुरुष 58 वर्षीय महिला, निगडे येथील 35 वर्षीय महिला, अडुळ येथील 37 वर्षीय पुरुष, वाई : पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष 18, 16 वर्षीय युवक 42, 49 वर्षीय महिला, रेनवले येथील 28 वर्षीय पुरुष, सातारा : कण्हेर येथील 62 वर्षीय पुरुष 65 वर्षीय महिला, रामकुंड येथील 35 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 44 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष 55 वर्षीय महिला, काशिळ येथील 23,37 वर्षीय पुरुष 36, 60 वर्षीय महिला 19 वर्षीय युवक,  लक्ष्मी टेकडी सदर बझार येथील 1 पुरुष व 4 महिला 50 वर्षीय महिला, जिहे येथील 38,45 वर्षीय  पुरुष,पोगरवाडी येथील 42 वर्षीय  पुरुष, शनिवार पेठ येथील 24 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ येथील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष, कोरेगांव : शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक, 26 वर्षीय पुरुष, जावली : रायगाव येथील 43 वर्षीय पुरुष 34 वर्षीय महिला, फलटण : रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला असे 69 जणांना कोरोमामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

432 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 28, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 111, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  15, कोरेगांव 4, वाई येथील 34, खंडाळा येथील 77, पानमळेवाडी 23, मायणी 32,  महाबळेश्वर 5 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 103 अशा एकूण 432 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील शनिवार पेठ (आयएचएसडीपी इमारत), शाहूनगर (शांताई अपार्टमेंट), रविवार पेठ (मार्केट यार्ड) तसेच तालुका हद्दीतील खेड (न्यू विकासनगर), क्षेत्रमाहुली (गणेश कॉलनी), संभाजीनगर (यशवंत कॉलनी), अपशिंगे (मोरेवस्ती), समर्थनगर (निशिगंध कॉलनी) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
error: Content is protected !!