जिल्ह्यात आणखी आठ जणांचा मृत्यू


दिवसभरात 263 पॉझिटिव्ह; 122 जण घरी परतले

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतानाच बाधितांच्या मृत्यूंची संख्या मात्र वाढतच चालली आहे. आज शनिवारी दिवसभरात आठ कोरोनाबाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर आणखी 263 बाधित आढळून आले. दरम्यान, आज 122 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


आठ बाधितांचा मृत्यू

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोडोली ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील घारळेवाडी येथील 65 वर्षीय महिला, शेणगाव ता. कराड येथील 72 वर्षीय महिला, तसेच खासगी रुग्णालयात कराड येथील 84 वर्षीय महिला, फडरवाडी (नेर) ता. खटाव येथील 74 वर्षीय पुरुष, रामदास कॉलनी फलटण येथील 74 वर्षीय पुरुष, वाघोशी ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा 48 वर्षीय पुरुष अशा आठ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. 

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे: 
कराड :
उंब्रज येथील 27 वर्षीय  पुरुष, इंदोलि येथील 45 वर्षीय पुरुष,वाजोशी येथील 32 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 35 वर्षीय पुरुष, रेठरे बु येथील 23 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 25, 28 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील  39 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय महिला, गावारे येथील 68 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 20 वर्षीय महिला, गुथले येथील 26 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 69 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 38 वर्षीय पुरुष, चोरे येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय महिला, 35, 30 वर्षीय पुरुष, वाहगाव येथील 32 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 69, 40 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चोरे येथील 25 वर्षीय पुरुष,रविवार पेठ, कराउ येथील 19 वर्षीय महिला, गोंदी येथील 25 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, रविवार पेठ, कराड येथील 60 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 8 वर्षाचा बालक, मंगळवार पेठ, कराड येथील 43 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 21 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 63 वर्षीय पुरुष,32 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, विद्यानगर, कराड येथील 26 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 36 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, खोडजायवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, हनबरवाडी येथील 24 वर्षीय महिला, टेंभू येथील 70 वर्षीय महिला, शिनोली येथील 40 वर्षीय पुरुष, वाठार येथील 30 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 55 वर्षीय पुरुष, कवटे येथील 62 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 33 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 23 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 42 वर्षीय पुरुष, कोळे येथील 31 वर्शीय पुरुष, आगाशिवनगर येथील 31 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40, 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, काले येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 25 वर्षीय महिला, काले येथील 37 वर्षीय महिला, तळबीड येथील 34 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 55 वर्षीय महिला, तारुक येथील 44 वर्षीय पुरुष, विंग येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 9 वर्षाची मुलगी, 56 वर्षाची महिला, आगाशिवनगर येथील 65 वर्षीय महिला, मलकापूर येथील 4 वर्षाची मुलगी, मलकापूर येथील 57 वर्षीय महिला, , 84 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 43 वर्षीय पुरुष, वाघेश्वरवाडी  येथील 54 वर्षीय पुरुष, सातारा : मंगळवार पेठ, सातारा येथील 50 वर्षीय महिला ,60 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 23 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 30 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष,  33 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, चिंचणेर निंब येथील 35 वर्षीय महिला, परखंदवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, विकासनगर येथील 30 वर्षीय पुरुष, सोळशी येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 15 वर्षाची युवती, सदरबझार, सातारा येथील 31 वर्षीय महिला, माचीपेठ, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, देगाव फाटा, एमआयडीसी, सातारा येथील  59 वर्षीय पुरुष, पाटण : पाटण येथील 56 वर्षीय पुरुष,गारवडे येथील 9 वर्षाची मुलगी, पापर्डे येथील 70 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, आरबवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, पापर्डे येथील 26 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 58 वर्षीय पुरुष, रामपूर येथील 53 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 25 वर्षीय महिला, कडवे येथील 59 वर्षीय पुरुष, वाई : उडतारे येथील 36 वर्षीय महिला, बावधन येथील 73, 40  वर्षीय महिला, पसरणी येथील 17 वर्षी युवती, बावधन येथील 11 वर्षाचा मुलगा, 70 वर्षीय पुरुष, गणपती आळी, वाई येथील 32 वर्षीय पुरुष, जांब येथील 35 वर्षीय महिला,14 वर्षाचा युवक, 41 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, 22 वर्षाची महिला, 17 वर्षीय युवक, पासरणी येथील 20 वर्षी युवक, भुईंज येथील 66, 36, 13 वर्षीय महिला, जांब येथील 62 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील 50 वर्षीय महिला,फुलेनगर येथील 54 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 50 वर्षीय महिला, खंडाळा : पळशी रोड, शिरवळ येथील 31 वर्षीय पुरुष, न्यु कॉलनी, शिरवळ येथील 25 वर्षीय पुरुष, बाजार पेठ, शिरवळ येथील 46 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 50 वर्षीय महिला, गुताळे येथील 35 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 65 वर्षीय  महिला, शिवाजी चौक, खंडाळा येथील 36 वर्षीय पुरुष, खटाव : मायणी येथील 24 वर्षीय पुरुष, फलटण : मंगळवार पेठ, फलटण येथील 17 वर्षी युवती, गुणवरे येथील 24 वर्षीय पुरुष, पेडगाव येथील 29 वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील 30 वर्षीय महिला, सोनवडी खुर्द येथील 55 वर्षीय महिला, कोरेगाव : वेलंग येथील 27 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 28 वर्षीय महिला, 4 वर्षाची बालिका,  50, 41, 37 वर्षाची महिला, 17, 15 वर्षाया युवक, देवूर येथील 17 वर्षी यवुक, 54 वर्षीय पुरुष, जरेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 24 वर्षीय पुरुष, 14 वर्षाचा युवक, 30 वर्षीय पुरुष, 31 कुठे येथील 31 वर्षीय पुरुष, कुमठे येथील  42, 17 वर्षीय पुरुष, 33, 30 वर्षाचा पुरुष, कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष्ज्ञ, 67 वर्षीय महिला, जावली : कुडाळ येथील 39 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 3 वर्षाचा बालक, 5, 3 वर्षाची बालका, 41 वर्षीय पुरुष तसेच खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये अजिंक्य कॉलनी, कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, पांढरवाडी ता. माण येथील 72 वर्षीय महिला, सोनगाव निंब क्षेत्र माहुली  येथील 58 वर्षीय पुरुष, कुरवली ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, संगमनगर, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, औंध येथील 62 वर्षीय महिला, , खबालवाडी ता. पाटण येथील 30 वर्षीय पुरुष. पनवेल जि. रायगड येथील 59, 25 वर्षीय पुरुष यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

आणखी 263 जण बाधित
शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 263 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
जावळी तालुक्यातील 15, कराड तालुक्यातील 74, खटाव तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील 7, सातारा तालुक्यातील 17, वाई तालुक्यातील 5 अशा 122 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.

465  जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 45,  स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 43,  कोरेगांव 15,  वाई येथील 38,  शिरवळ-खंडाळा येथील 78,  रायगाव येथील 11,  पानमळेवाडी येथील 36, मायणी येथील 20, महाबळेश्वर येथील 14, पाटण येथील 19, खावली येथील 30, कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 107 अशा एकूण 465 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील विसावा नाका (माने हॉस्पिटल मागे), मंगळवार पेठ (चिपळूणकर कॉलनी), गोडोली (पोलीस वसाहत), शनिवार पेठ, करंजे (फडतरे वाडा), शनिवार पेठ (नंदन क्लासिक) तसेच तालुका हद्दीतील शेंद्रे (माळ वस्ती), किडगाव (भिलारवाडी), सोनगाव सं. निंब (ग्रामपंचायत कार्यालय),  या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
error: Content is protected !!