जिल्ह्यात बाधितांची संख्या 1700 च्या पार !


दिवसभरात 51 जण पॉझिटिव्ह; 27 जण कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1700 च्या पार पोचलीये. दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढतच चाललाय. रविवारी जिल्ह्यात आणखी 51 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, दिवसभरात 27 जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. 


शनिवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे

जावली : पुनवडी येथील 40 व 19 वर्षीय पुरुष, तसेच अनुक्रमे 35, 31, 42, 72, 21 व 26 वर्षीय महिला, सायगाव येथील 51 वर्षीय पुरुष, कराड : पंचायत समिती (कराड) येथील 50 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, मलकापूर येथील 48 व 21 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, ओगलेवाडी येथील 72 व 41 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी (तुळसण) येथील 45 वर्षीय पुरूष, तारुख येथील 65 वर्षीय पुरुष, मसूर येथील 37 वर्षीय महिला, तोंडोली ( ता. कडेगाव, जि. सांगली) येथील 34 वर्षीय पुरूष, आटूगडेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली) येथील 25 वर्षीय पुरूष,  कोरेगाव : भाडळे येथील 23 व 30 वर्षीय पुरूष, ल्हासुर्णे येथील अनुक्रमे 48, 25,18 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय महिला, सुभाषनगर येथील अनुक्रमे16, 44 व 16 वर्षीय पुरुष तसेच 42 व 63 वर्षीय महिला, निगडी येथील 25 वर्षीय पुरूष, वाठार किरोली येथील 73 वर्षीय पुरूष, माण : राजवडी (दहीवडी) येथील 31 वर्षीय पुरूष, दहिवडी येथील 45 वर्षीय पुरूष, कारंडेवाडी (दहिवडी) येथील 23 वर्षीय पुरूष, पाटण : कुंभारगाव येथील 43 वर्षीय महिला, सोनाईचीवाडी येथील 44 वर्षीय पुरूष, चाळकेवाडी (कुंभारगाव) येथील 55 वर्षीय पुरुष, गारवडे येथील 36 वर्षीय पुरुष, कसणी येथील अनुक्रमे 40,15, 25 व 45 वर्षीय महिला तसेच अनुक्रमे 42, 25, 60 व 75 वर्षीय पुरुष आणि 14 वर्षीय बालक, सातारा : जिहे येथील अनुक्रमे 51, 50 व 69 वर्षीय पुरुष तसेच अनुक्रमे 42, 65, 52, 60 व 24 वर्षीय महिला, खावली येथील 60 वर्षीय महिला व 63 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 60 वर्षीय महिला, कोडोली येथील 40 वर्षीय महिला, वाई : पसरणी येथील 65 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, सोनगीर येथील अनुक्रमे 36, 14 व 70 वर्षीय पुरुष, फलटण : आसू येथील 22 वर्षीय महिला, फरांदवाडी येथील 69 व 51 वर्षीय पुरुष व 2 महिन्यांचे अर्भक, जाधववाडी येथील 13 वर्षीय बालिका व 61 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 45 वर्षीय महिला, खंडाळा : शिरवळ येथील अनुक्रमे 22, 54, 65, 28, 71 वर्षीय महिला तसेच अनुक्रमे 82, 34, 27, 25, 20 वर्षीय पुरुष, कोलाटेआळी येथील 18 वर्षीय तरुण, भगवा चौक येथील 50 वर्षीय पुरुष, अंबिका माता येथील 62 वर्षीय पुरुष, शिर्के कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, कबूले आळी येथील 45 व 22 वर्षीय महिला आणि 17 वर्षीय तरुण असे एकूण 94 कोरोनाबाधित आढळले. 

आणखी 51 जण पॉझिटिव्ह
रविवारी रात्री पुणे येथून आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 51 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.     त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 1746 झाला आहे.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
जावली : 52 वर्षीय महिला, करहर येथील 7 वर्षीय बालक, मरळी येथील 82 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील अनुक्रमे 15,19, 20 व 23 वर्षीय तरुणी तसेच अनुक्रमे 12, 48, 58, 60 व 27 वर्षीय पुरुष, माण : कोळेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, कोरेगाव : पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : लाकवड येथील 28 वर्षीय पुरुष, खंडाळा : शिरवळ येथील 22 वर्षीय महिला व 24 व 25 वर्षीय पुरुष, सातारा : शाहुनगर येथील 20 वर्षीय पुरुष, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, भंडारी प्लाझा (गोडोली) येथील 32 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी येथील 28 वर्षीय पुरुष, माळवाडी येथील 24 वर्षीय पुरुष, सिव्हिल हॉस्पिटल येथील 48 वर्षीय महिला, फलटण : आंदरुड येथील 52 वर्षीय पुरुष व अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय बालिका अशा 27 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

259 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय (सातारा) येथील 25, ग्रामीण रुग्णालय (फलटण) येथील 3, कोरेगाव येथील 51, वाई येथील 38, खंडाळा येथील 80, रायगाव येथील 56, पानमळेवाडी येथील 31, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 4, खावली येथील 13 अशा एकूण 259 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एनसीसीएस (पुणे) व कृष्णा मेडिकल कॉलेज (कराड) येथे तपासणीकरिता पाठविण्यात आल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.



error: Content is protected !!