जिल्ह्यात बाधितांची संख्या चार हजार पार !


दिवसभरात उच्चांकी 203 जण कोरोनाबाधित; 54 कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात रोज कोरोनाबाधितांचे आकडे शंभराच्या पटीत वाढत आहेत. यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी उच्चांकी 203 कोरोनाबाधित आढळून आले तर 54 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे बाधितांची एकूण संख्या 4052 वर पोहोचली असून यापैकी 2036 जण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


 गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
पाटण :
त्रिपोडी येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 25 वर्षीय महिला, मल्हार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, नेरले येथील 35 वर्षीय महिला. वाई : बोरगाव येथील 17 वर्षीय युवक, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, यशवंतनगर येथील 28 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती, परखंदी येथील 73 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष, मुंगसेवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष. कराड : शामगाव येथील 76,44 वर्षीय महिला 13 वर्षीय मुलगी,कालवडे येथील 14,12,13 वर्षीय युवक, 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला व  20 वर्षीय पुरुष, घरलवाडी येथील 59 वर्षीय पुरुष,वडगांव येथील 63 वर्षीय पुरुष 60,34 वर्षीय महिला, 7,9 वर्षीय बालीका, शिवडे येथील 25,63 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय पुरुष,उंब्रज येथील 65,58 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष व 65,37 वर्षीय महिला व 14,17 वर्षीय बालक, आगाशिवनगर येथील 36,40,65 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय बालक, 19 वर्षीय तरुण, 17 वर्षीय युवती,  गजानन हौ. सोसा. येथील 78 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 37 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 25 वर्षीय महिला, कोयनावसाहत येथील 20,50,37,37 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष,18,12वर्षीय युवक व 15 वर्षीय युवती, मलकापूर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष,रविवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, रेठरे बु. येथील 34 वर्षीय पुरुष,सह्याद्री हॉस्पिटल येथील 16 वर्षीय युवती, 46,35 वर्षीय महिला, खंडाळा : बावडा येथील 89 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, पंढरपूर फाटा येथील 26 वर्षीय पुरुष,28 वर्षीय महिला, वींग येथील 45 वर्षीय पुरुष व 74 वर्षीय महिला, खंडाळा येथील 30, 33 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 20 वर्षीय पुरुष,राजेवाडी येथील 75 वर्षीय महिला, मंडई कॉलनी शिरवळ येथील 19 वर्षीय महिला, मोरवे येथील 67 वर्षीय पुरुष, सातारा : भवानी पेठ येथील 28,21 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 3, 12 वर्षीय बालक, 23,38 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 57 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ येथील 62 वर्षीय पुरुष, अतीत येथील 49 वर्षीय पुरुष, औंध येथील 70 वर्षीय महिला, गोडोली येथील 39 वर्षीय महिला, शिवथर येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपुरी येथील 63 वर्षीय पुरुष, सदर बझार येथील 23 वर्षीय महिला. माण : दहिवडी येथील 33,35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, शिंगणापूर येथील 69 वर्षीय पुरुष. कोरेगाव : वाठार स्टेशन येथील 36 वर्षीय पुरुष, पिंपोडे येथील 36 वर्षीय पुरुष व 30 वर्षीय महिला, वाघोली येथील 35 वर्षीय महिला व 55,60,74 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगांव येथील 50 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, रहीमतपुर येथील 24 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 70 वर्षीय महिला, खटाव : खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडुज येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, मायणी येथील 39,31 वर्षीय पुरुष. फलटण : जींती नाका येथील 18 वर्षीय युवक, 33,74 वर्षीय महिला, लक्ष्मीनगर येथील 57 वर्षीय पुरुष, मुंजवडी येथील 45, 20, 39 वर्षीय पुरुष, 17,14,13 वर्षीय युवती व 35  वर्षीय महिला व 4 वर्षाची बालीका, रविवार पेठ येथील 27 वर्षीय महिला, सासवड येथील 70,64 वर्षीय पुरुष, पाडेगांव येथील 38 वर्षीय पुरुष, उपळे येथील 53 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : रांजणवाडी येथील 11,9,7 वर्षीय बालीका 70,23 वर्षीय महिला, 58,23,38,51,60,55 वर्षीय पुरुष,  गोडवली येथील 31,70,23 वर्षीय महिला, मल्होत्राभवन भोसे खिंड येथील 30 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालीका, पाचगणी येथील 24 वर्षीय पुरुष व 22 व 48 वर्षीय महिला. जावली : दुदुस्करवाडी 55,60,25,31,45,60 वर्षीय महिला,75,40,35,30,29,53,57,91 वर्षीय पुरुष व 10,8 वर्षाचा बालक व 6 वर्षाची बालीका,सायगाव येथील 54 वर्षीय पुरुष असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आणखी 203 जण बाधित
गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 203 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. दरम्यान, 25 मे ते 26 जुलै या दरम्यान जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 25 रुग्णांचे खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित आढळले. याची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा तालुका- 16 (सातारा शहर 7), जावळी तालुका-2, वाई तालुका-1, माण तालुका-1, पाटण तालुका-1,  खटाव तालुका-1, खंडाळा तालुका-1, इचलकरंजी (कोल्हापूर)-1,  कडेगाव (सांगली)-1 असे 25 कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. सदर बाधितांची नोंद एकूण बाधितांच्या संख्येमध्ये करण्यात आली आहे. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
महाबळेश्वर :  बेल एअर हॉस्पीटल येथील 28 वर्षीय पुरुष, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष, खंडाळा :  खंडाळा ग्रामपंचायत येथील 34 वर्षीय पुरुष व 6 वर्षीय मुलगा व 8 वर्षीय मुलगी, सातारा : अंगापूर वंदन येथील 55 वर्षीय पुरुष, कामेरी येथील 51 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, गोजेगाव येथील 27, 23, 55 वर्षीय पुरुष व 2 वर्षीय मुलगी, कण्हेर येथील 18, 40 वर्षीय पुरुष व 24, 20,27, 65 वर्षीय महिला व 1 वर्षीय बालिका, शेळकेवाडी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील बुधवार पेठेतील 16, 53, 49 वर्षीय पुरुष, जिहे येथील 34 वर्षीय पुरुष, कराड :  सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, नेरले येथील 15 वर्षीय मुलगी, कालवडे येथील 67,60 ,40 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 18, 30, 27  वर्षीय पुरुष, कराड शहरातील बुधवार पेठेतील 30 वर्षीय महिला, कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 34 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला, जावली : मेढा येथील 31 वर्षीय महिला व 11 वर्षीय मुलगा, रायगाव येथील 22, 24, 31, 34,  35 वर्षीय पुरुष व 25,45,21,25 वर्षीय महिला, मोरघर येथील 30 वर्षीय महिला, पाटण : नारळवाडी येथील 29 वर्षीय महिला, खटाव : वडूज येथील 69 वर्षीय पुरुष, वाई : बावधन येथील 59 वर्षीय महिला, शेंदुरजणे येथील 80 वर्षीय महिला व 14 वर्षीय युवक, माण : आंधळी येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

524 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 104, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  33,  कोरेगांव येथील 2, वाई येथील 44, शिरवळ येथील 52, रायगाव 14, पानमळेवाडी 15, मायणी 54,  महाबळेश्वर 27, पाटण 58, दहिवडी 23, खावली येथे 13 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 79 अशा एकूण 555 जणांचे नमुने घेण्यात आले आले. 

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील गुरुवार पेठ, करंजे (भोसले मळा), यादोगोपाळ पेठ या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.




error: Content is protected !!