जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच…!


दिवसभरात 196 जण पॉझिटिव्ह , पाच मृत्यू , 62 कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दररोज बाधितांच्या संख्येत शंभराच्या पटीत वाढ होत असून कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्याही वाढत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील आणखी 196 बाधितांची नोंद झाली तर 5 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.  दरम्यान, आज 62 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून 450 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


पाच बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे औंध ता. खटाव येथील 70 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 72 वर्षीय पुरुष, निसरी ता. पाटण येथील 80 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या कराड येथील रविवार पेठेतील 62 वर्षीय पुरुष, खटाव येथील  75 वर्षीय पुरुष अशा 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
मसूर येथील 24 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, पाटण कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 30 वर्षीय पुरुष, विमानतळ, कराड येथील 61 वर्षीय पुरुष, शेरे येथील 45 वर्षीय पुरुष, विद्यानगर, कराड येथील 54 वर्षीय पुरुष, टेंभू 39 वर्षीय महिला, विद्यानगर, कराड येथील 25 वर्षीय पुरुष, कोळे येथील 41 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 24 वर्षीय पुरुष, लाहोटीनगर, मलकापूर येथील 30, 32 वर्षीय महिला, म्हासोली येथील 34 वर्षीय पुरुष,, कराड येथील 25 वर्षीय महिला, नांदगाव येथील 45 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड येथील 8 वर्षाचा मुलगा, 67 वर्षीय महिला, शामगाव यैथील 42 वर्षीय पुरुष, कराड येथील 26 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 48 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, सैदापूर येथील 16 वर्षाचा युवक, शनिवार पेठ, कराड येथील 14 वर्षाची युवती, 12 वर्षाचा मुलगा, मंगळवार पेठ, कराड येथील 23, 21 वर्षीय महिला, सैदापूर येथील 32 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 36 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35, कालगाव येथील 60, 26 वर्षीय महिला, बनवडी येथील 53 वर्षीय महिला, रेठरे बु येथील 70 वर्षीय महिला, टेंभू येथील 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 28 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 21, 55 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 34 वर्षीय महिला, कराड येथील 37 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 32 वर्षीय पुरुष, मुंडे येथील 26 वर्षीय महिला, बनवडी येथील 33 वर्षीय पुरुष, शेरे येथील 58 वर्षीय पुरुष, कराड येथील 80 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 73 वर्षीय पुरुष, चोरे येथील 35 वर्षीय महिला, मुंडे येथील 26 वर्षीय महिला, कार्वे येथील 37, 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 21 वर्षीय पुरुष, हेळगाव येथील 32 वर्षीय पुरुष, गुरुरुवार पेठ, कराड 77 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील42 वर्षीय महिला, सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 47 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 20 वर्षीय महिला, कोर्वे येथील 6 वर्षाचा बालक,घोनशी येथील 46 वर्षीय पुरुष, चोरे येथील 54 वर्षीय महिला, वंडोली येथील 46 वर्षीय पुरुष, 40 वर्षाची महिला, कार्वे नाका येथील 15 वर्षाचा युवक, मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 62 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 18 वर्षाचा युवक, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला, चोरे येथील 60 वर्षाचा पुरुष, मुंडे येथील 42 वर्षीय महिला, सातारा : खंडोबाचीवाडी लिंब येथील 26 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथील 23 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, गोरखपूर येथील 32 वर्षीय पुरुष, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 45, 30 वर्षीय पुरुष, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 24 वर्षीय पुरुष, विलासपूर येथील 43, 19 वर्षीय महिला, कोडोली येथील 85 वर्षीय पुरुष, सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, निगडी येथील 48 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष, 92 वर्षीय महिला, नागठाणे येथील 70 वर्षीय महिला, शिवथर येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 5 वर्षाची बालिका, 50 वर्षाची महिला, ऐक्य प्रेस जवळ, सातारा येथील 32 वर्षीय महिला, खेड येथील 21 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 54 वर्षीय महिला, कळंबे येथील 6 वर्षाचा बालक, 55, 45 वर्षाची महिला, खटाव : चितळी येथील 46 वर्षीय पुरुष, मायणी येथील 34 वर्षीय पुरुष, औंध येथील 55 वर्षीय पुरुष, मायणी येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण : सोनावडे येथील 67 वर्षीय पुरुष, पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, खांडेकरवाडी सोनवडे येथील 65 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, पापर्डे येथील 13, 35 वर्षाचा पुरुष, 43 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 55 वर्षीय महिला, तारळे येथील 67, 33 वर्षीय पुरुष, सणबूर येथील 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 7 वर्षाचा बालक, 30, 45 वर्षीय महिला, पाटण येथील 23 वर्षीय पुरुष,  खंडाळा : लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 35 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, पवार वस्ती, शिरवळ येथील 38 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 13 वर्षाची युवती, लोणंद येथील 29, 27 वर्षीय पुरुष, 27, 26 वर्षीय महिला, बावडा येथील 46 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 40 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 50, वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 32, 38 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, 9 वर्षाचा मुलगा, 17, 24 वर्षाची महिला, 40 वर्षाचा पुरुष विंग येथील 64 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 44 वर्षीय पुरुष, कोरेगाव : नायगाव येथील 32 वर्षीय पुरुष, वाठार स्टेशन येथील 3 वर्षाचा बालक, 13 वर्षाचा युवक, 55, 35 वर्षाची महिला, तडवळे येथील 46, 45 वर्षीय पुरुष 45, 35 वर्षीय महिला, खेड नांदगीरी येथील 35, 45  वर्षीय पुरुष, देवूर येथील 62, 37, 31 वर्षीय महिला, 47, 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, 4 वर्षाची बालिका, हिवरे येथील 29 वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक येथील 42 वर्षीय पुरुष, वाई : पसरणी येथील 17 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, शेंदूजर्णे येथील 17 वर्षाची महिला, 39, 70 वर्षीय महिला, 65, 76 वर्षीय पुरुष, पासरणी येथील 59, 30 वर्षीय पुरुष, होळी येथील 57, 30 वर्षीय पुरुष, वाई येथील 30, 28 वर्षीय पुरुष, वाई येथील 48 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 24, 22 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 51 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, 57 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 74 वर्षीय पुरुष, माण : म्हसवड येथील 24 वर्षीय पुरुष, फलटण :  मुंजवडी येथील 9 वर्षाची मुलगी, 36 वर्षाचा पुरुष, 32 वर्षाची महिला, 30 वर्षीय पुरुष, 15 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा, सोनवडी येथील 61 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 75 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, नांदल येथील 26 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 46 वर्षीय पुरुष तसेच खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये संगमनगर, खेड येथील 48 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 73 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील कुडाळ येथील 75 वर्षीय पुरुष, आंबवडे वाघोली येथील 40 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, विकासनगर, सातारा येथील 17 वर्षीय महिला, महाबळेश्वर : स्कूल मोहल्ला, महाबळेश्वर येथील 39 वर्षीय पुरुष, गवळी मोहल्ला, महाबळेश्वर येथील 46, 21, 18, 18, 46 वर्षीय महिला, 52, 21, 51 वर्षीय पुरुष, कालसुते खुर्द जि. रत्नागिरी येथील 28 वर्षीय पुरुष, खुजगाव ता. शिराळा जि. सांगली येथील 36 वर्षीय पुरुष, मंगरुळ ता. विटा जि. सांगली येथील 45 वर्षीय पुरुष, 15 वर्षाचा युवक यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

आणखी 196 जण बाधित
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 196 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
कापील  येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, कालवडे येथील 30 वर्षीय महिला. खंडोबानगर (मलकापूर) येथील 4 वर्षीय बालक, वडगाव हवेली येथील 43 वर्षीय पुरुष, पाटण : नेरले येथील 23 वर्षीय पुरुष., कासरुंड येथील 12, 17 वर्षीय युवती व 35 वर्षीय महिला., निगडे येथील 45 वर्षीय पुरुष, वाई :  वेळे येथील 40 वर्षीय महिला, सातारा : कण्हेर येथील वय 22, 40, 40, 34, 90, 40, 25, 62, 30, 54, 18,40, 37 वर्षीय महिला व वय 51, 50, 40, 56, 55, 7, 22, 11, 36, 5, 57, 16, 12, 16, 65 वर्षीय पुरुष., तामजाईनगर सातारा येथील 44 वर्षीय महिला., लक्ष्मी टेकडी येथील वय 56, 18, 7, 42 वर्षीय महिला व वय 42, 35 वर्षीय पुरुष, सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 44, 20, 42 वर्षीय महिला व 47, 19, 38,54 वर्षीय पुरुष, रामकुंड येथील 10 वर्षीय बालक, प्रतापगंज पेठेतील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 29 वर्षीय महिला व 32 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : गोडवली येथील  23, 38 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, जावली : सायगाव येथील 36 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला, फलटण : फलटण शहरातील गोळीबार मैदान येथील 53 वर्षीय पुरुष अशा 62 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 

450 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 32, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 86, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  30, कोरेगांव 4, वाई येथील 29, खंडाळा येथील 80, पानमळेवाडी 21,  महाबळेश्वर 6, पाटण 13, दहिवडी 36, खावली 55, कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 58 अशा एकूण 450 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील प्रतापगंज पेठ, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, बसाप्पा पेठ (सिद्धीविनायक रेसिडेन्सी) तसेच तालुका हद्दीतील जकातवाडी (कुरणेश्‍वर कॉलनी), खेड (गावठाण परिसर), खेड (गजानन नगरी, पिरवाडी), कोडोली (मेघदूत कॉलनी), नागठाणे (हिराई गोल्डन सिटी) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
error: Content is protected !!